एक्स्प्लोर
सत्ताधारी-विरोधी आमदारांची एकमेकांविरोधात हसत हसत घोषणाबाजी
घोषणाबाजी सुरु असताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. दोन्ही बाजूचे आमदार विरोध करताना हसत होते.
मुंबई : मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत आमदार गंभीर आहेत का असं चित्र आज विधीमंडळात पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज विधानभवानाच्या पायऱ्यांवर बसून एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे विरोध करताना आमदार हसत होते.
मराठा आरक्षणाच्या अहवालावरुन विधानपरिषदेचं कामकाज तहकूब झाल्यावर, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, सुरेश धस पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षाच्या आमदारांविरोधात घोषणाबाजी करत होते. यानंतर विरोधी पक्षाचे आमदार बाहेर आल्यावर त्यांनीही सत्ताधारी आमदारांविरोधात घोषणाबाजी सुरु केली
घोषणाबाजी सुरु असताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. दोन्ही बाजूचे आमदार विरोध करताना हसत होते. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार गंभीर आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेलआमदार आपल्या जुन्या साथीदारांविरोधात घोषणा देताना हसताना दिसले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement