एक्स्प्लोर
मुंबईत दोन ठिकाणच्या कारवाईत एकूण 73 लाखाच्या बनावट नोटा जप्त
मुंबई : वांद्र्यातून दोन हजारांच्या तब्बल 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ताजी असतानाच गोरेगावमधूनही 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
बनावट नोटांची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेनं वांद्र्यात ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी विजय कांबळे, जतीन सोळंकी आणि सचिन बंशी असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणाचा विजय कांबळे हा मास्टरमाईंड असून त्याच्याकडून प्रिंटर, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
तर वांद्र्यातील ही घटना ताजी असतानाच गोरेगावमधूनही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गोरेगाव पोलिसांच्या कारवाईत तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या चलनातील बनावट नोटा बाद कराव्यात हा मोदींचा नोटाबंदीमागचा महत्त्वाचा उद्देश होता. मात्र, मुंबईत एकूण 73 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यामुळं, मोदींचा उद्देश सपशेल फोल ठरलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement