एक्स्प्लोर

कल्याणमध्ये रोबोट करणार कोरोना बाधित रुग्णांची शुश्रूषा!

कल्याणमध्ये रोबोट कोरोना बाधित रुग्णांची शुश्रूषा करणार आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होण्यास मदत होणार आहे.

कल्याण : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होत आहे. यावर कल्याण डोंबिवली महापालिका एक उपाय काढला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यापुढे रोबोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांची शुश्रूषा केली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. डोंबिवलीच्या एका तरुणाने या रोबोटची निर्मिती केली आहे.

डोंबिवलीच्या प्रतिक तिरोडकर या तरुणाने त्याच्या टीम सोबत हा रोबोट तयार केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलं होतं. त्यावर उपाय म्हणून हा रोबो उपयुक्त ठरणार असून बाधित रुग्णांना औषधं, फळं, बिस्किटं आणि पिण्याचं पाणी या रोबोकडून दिलं जाणार आहे. इतकंच नव्हे, तर आपल्या आजूबाजूला जंतुनाशक फवारणी सुद्धा हा रोबो करणार आहे. त्यात दिलेल्या स्क्रिनवर गाणी, बातम्या किंवा अन्य व्हिडीओज युट्युबवर पाहता येणार आहेत. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक तिरोडकरकडून हा रोबोट घेऊन तो केडीएमसीला दान केला आहे. त्यामुळे केडीएमसीच्या कोविड स्पेशालिटी रुग्णालयात यापुढे आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताण काही प्रमाणात हलका होणार आहे.

जिल्हा पातळीवर कोविड टेस्टिंग लॅब उभारण्याची गरज नाही, राज्य सरकार भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी

राज्यात आज विक्रमी रुग्ण कोरोनामुक्त राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक सकारात्मक बातमी आली आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आज कोरोनाच्या 2682 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.38 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे.

Covid Hospital | वाशीच्या कोव्हिड हॉस्पिटलची पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी,येत्या आठवड्यात रुग्णांची सोय होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget