एक्स्प्लोर

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना चोपलं पाहिजे; 'एबीपी माझा'च्या बातमीवर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

नागपुरात आयसीयूमध्ये दाखल अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले आणि त्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळातही संधी शोधणारे रोज एक ना एक आढळून येत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार वाढला आहे. नागपुरातही असाच एक प्रकार समोर आला. आयसीयूमध्ये दाखल अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले आणि त्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला. या घटनेवर अभिनेता रितेश देशमुखने एबीपी माझाची बातमी वाचून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोप दिला पाहिजे.

काय आहे प्रकरण?

नागपुरातील जामठा परिसरातील 'कोविडालय' नावाच्या रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याने आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन दिले होते. मात्र, दिनेश गायकवाडने (आरोपी पुरुष नर्स) तीन पैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याकडे ठेवले आणि त्याऐवजी अत्यवस्थ रुग्णाला चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले. त्यानंतर रुग्णालयातील रेकॉर्डवर संबंधित रुग्णाला विशिष्ट कालावधीत तीन रेमडेसिवीर इंजेक्शन टोचल्याची नोंद केली.

दिनेश गायकवाडने चोरलेले दोन्ही इंजेक्शन्स नागपुरातील घरी (तो इतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शेयरिंगमध्ये राहतो) आणून ठेवले. मात्र, दोन दिवसांनी हे इंजेक्शन त्याचा रुम पार्टनर असलेल्या आणि एका दुसऱ्या रुग्णालयात वॉर्डबॉय असलेल्या शुभम पानतावणे नावाच्या मित्राने चोरले. शुभम त्याच्या प्रणय येरपुडे आणि मनमोहन मदन नावाच्या इतर मित्रांच्या मदतीने एका इंजेक्शन 35 हजार रुपये दराने काळाबाजारी करताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी जेव्हा शुभम पानतावणेची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने हे इंजेक्शन दिनेश गायकवाड याच्या कपाटामधून चोरल्याचे सांगितले. 

पोलिसांनी दिनेश गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हे इंजेक्शन 'कोविडालय' या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका अत्यवस्थ रुग्णासाठीचे असून त्याला रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन लावल्याचे दिनेश गायकवाडने पोलिसांना सांगितले. सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दिनेश गायकवाड, शुभम पानतावणे, प्रणय येरपुडे, मनमोहन मदन या चार आरोपींसह एका महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. ही महिला डॉक्टर एका तिसऱ्या रुग्णालयाची असून ती हे इंजेक्शन पुढे काळाबाजार करुन विकण्यात मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान, कोविडालय या रुग्णालयातील आयसीयूमध्ये अत्यवस्थ असलेला आणि रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन लावण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. आता तो कोरोनामुक्त होऊन घरी असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget