एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर केलेले आरोप चुकीचे आणि नौदलाची बदनामी करणारे : निवृत्त अॅडमिरल राव
संरक्षण आणि नौदलाच्या प्रोटोकॉलनुसार कुठल्याही पंतप्रधानांच्या औपचारिक दौऱ्यावर युद्ध नौका किंवा हेलिकॉप्टर वापर करण्यात काही गैर नाही, असे राव यांनी सांगितले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर केलेले आरोप चुकीचे आणि नौदलाची बदनामी करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया निवृत्त अॅडमिरल आय सी राव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी आणि परिवाराने INS विराट युद्ध नौकेचा मनोरंजनासाठी टॅक्सीसारखा वापर केला, या आरोपांवर निवृत्त व्हाईस अडमिरल आय सी राव यांनी खंत व्यक्त केली.
संरक्षण आणि नौदलाच्या प्रोटोकॉलनुसार कुठल्याही पंतप्रधानांच्या औपचारिक दौऱ्यावर युद्ध नौका किंवा हेलिकॉप्टर वापर करण्यात काही गैर नाही, असे राव यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गरजेचं असतं कारण प्रायव्हेट हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊसवर माहिती लिक होण्याची किंवा बगिंग होण्याची भीती असते, असे राव यांनी सांगितलं.
पंतप्रधानांनी केलेले आरोप नवे नाहीत, यापूर्वीही असे आरोप झालेत आणि यासंदर्भात नौदलाने खुलासे केले आहेत, असेही त्यांनी सांगितलं. 6 मे 2019 रोजी त्यावेळेस INS विराट वर कमांडिंग नेव्हल ऑफिसर कॅप्टन पासरीचा यांनी सदर्न नेव्हल कमांडच्या प्रमुखांना पत्र लिहून या आरोपांचं खंडन केले आहे.
लक्षद्वीप दौऱ्यावर राजीव गांधी असताना कुठलीही पार्टी झाली नव्हती, कोणीही परदेशी पाहुणे नव्हते. सोनिया गांधी आणि राहुल गांधींव्यतिरिक्त कोणीही ऑन बोर्ड नव्हते, असेही राव म्हणाले.
राजकारणासाठी संरक्षण खात्याच्या नावाचा वापर होणे चुकीचे आणि निंदणीय आहे. पंतप्रधान सारख्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने याची काळजी घेतली पाहिजे, असेही राव म्हणाले.
काय म्हणाले होते मोदी
माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी केला होता, असा खळबळजनक आरोप राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. 'राजीव गांधी आपल्या सासरच्या मंडळींसोबत आयएनएस विराट या युद्धनौकेवरुन सुट्टीवर गेले होते. दहा दिवस सर्व जण एका बेटावर राहिले. तिथे युद्धनौकेवरील कर्मचारीवर्ग त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. हा देशाच्या सुरक्षेसोबत खेळ नाही का?' असा सवाल मोदींनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement