एक्स्प्लोर
मंत्रालयात मोठी खांदेपालट, सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली
गेल्या काही दिवसांपासून प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात येत आहे. पुन्हा एकदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई : राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात येत आहे. पुन्हा एकदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गृह विभागाचे मुख्य अतिरिक्त सचिव एस. के. श्रीवास्तव यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे मुख्य अतिरिक्त सचिव सुनील पोरवाल यांची गृह विभागाचे मुख्य अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्यावरण विभागाचे मुख्य अतिरिक्त सचिव एस. एम. गवई यांची उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे मुख्य अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या (Reforms) मुख्य अतिरिक्त सचिव वंदना कृष्णा यांची शालेय शिक्षण, क्रीडा विभागाच्या मुख्य अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे मुख्य सचिव नंद कुमार यांची सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आणि स्पेशल ड्युटी ऑफिसर अनिल डिग्गीकर यांची पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी राजगोपाल देवरा यांची वित्त विभागाचे (Reforms) मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement