एक्स्प्लोर

Reliance on Coronavirus : रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार, मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध, सर्व सुविधाही पुरवणार

रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600, वरळतील एनएससीआय मध्ये 100,  सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयुसह 125 बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे 100 बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे. 

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. यात महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. अशात कोविड पेशंटला बेडसह ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशात अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढं येऊ लागल्या आहेत. रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600, वरळतील एनएससीआय मध्ये 100,  सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयुसह 125 बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे 100 बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे. 
 
माहितीनुसार, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेली 650 बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण 650 खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल. याशिवाय  अधिकच्या 100 ICU बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. 15 मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील, अशी माहिती आहे. रिलायंस फाऊंडेशनकडून 500 हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे. ICU बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.

गेल्या वर्षीसुद्धा फाउंडेशनच्या वतीने मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खास 225 बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये 100 बेड्स आणि 20 ICU बेड्सची जबाबदारी उचलली होती. यावर्षीही सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि NSCI इथल्या कोविड सेंटरमधल्या सर्व कोविड रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे. एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील.

वांद्रे-कुर्ला कॅम्प्लेक्स (बीकेसी) येथील द ट्रायडंट हॅटेलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किरकोळ लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांची सुविधा आहे. ही सुविधेचे व्यवस्थापन आता सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करेल. एनएससीआय, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि बीकेसी येथील द ट्रायडंट येथील अतिदक्षता विभागातील 145 खाटांसह आता सर्व मिळून 875 खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स फाऊंडेशनमार्फत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी  रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध आहे. आमचे डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स अहोरात्र राबून सेवा पुरवत आहेत. आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवून जीव वाचवण्याचं काम असंच करत राहू. मुंबईतल्या 875 कोविड बेड्सची व्यवस्था आम्ही पाहात आहोत. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्ये प्रदेश आणि दमण दीव, नगर हवेली इथे दररोज 700 MT इतका ऑक्सिजनचा पुरवठा फाउंडेशनच्या वतीने मोफत देण्यात येत आहेत. या संकटकाळात देशवासीय म्हणून जेवढं शक्य आहे ते आम्ही करत आहोत, असं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने (आरएफ) शहरातील कोविड व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत तसेच वैश्विक साथीविरुद्ध लढणाऱया शासनाला साहाय्य करण्यासाठी तिचे या क्षेत्रातील कार्य अधिक वेगवान केले आहे. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करताना मुंबईतील कोविडविरोधातील लढाईसाठी रिलायन्सने आणखी चार उपक्रम राबविले आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Embed widget