एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला धक्काबुकी केल्याचा आरोप
मुंबई: डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीप्रकरणी राज्यभरातील डॉक्टर संपावर असताना मुंबईतील सायन रुग्णालयात एका महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
मुंबईतल्या सायन रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डॉ. मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, त्यावेळी तिथं सुरक्षा रक्षकही उपस्थित नसल्याचा आरोप तेथील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे आंदोलन लवकर मागे घेण्यात यावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकारकडून डॉक्टरांना आज (22 मार्च) रात्री 8 वाजेपर्यंतचा अल्टिमेटमही देण्यात आला होता. पण अद्यापही आंदोलन सुरुच आहे. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतल्याचा दावा केला होता. पण अद्यापही बऱ्याच ठिकाणी डॉक्टर संपावर आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.
आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा
– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा
संबंधित बातम्या:
'मार्ड' आंदोलनावर ठाम, डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता
‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’, गिरीश महाजन यांचा दावा
आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार
नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित
हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट
डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी
राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement