एक्स्प्लोर
Advertisement
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचं हत्यार उपसलं आहे.
धुळ्यापाठोपाठ मुंबईत डॉक्टरांवर हात उचलल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मारहाण केली. या घटनेच्या विरोधात निवासी डॉक्टर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सामूहिक रजेवर गेले आहेत.
नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमधील रुटीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सायन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या 'त्या' डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement