एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट झाल्यानं या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Raosaheb Danve On Ashok Chavan Devendra Fadnavis Meet : गणेशोत्सवातील (Ganesh Utsav) गाठीभेटींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची (Maharashtra Political Crisis) चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट झाल्यानं या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दानवे यांनी म्हटलं आहे की, आता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला तयार आहोत. आता अशोक चव्हाण यांची चर्चा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली होती. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

आज आम्हाला कोणाची गरज नाही. कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आलं तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावं. ही वैचारिक लढाई आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.  

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी रात्री भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी दानवे बोलत होते.

फडणवीस भेटीबद्दल अशोक चव्हाणांनी काय दिलं स्पष्टीकरण

अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल अशोक चव्हाण आणि फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. ही भेट गणपतीदर्शनामुळे घडलेला योगायोग होता की कुलकर्णी यांनी समन्वयानं भेट घडवून आणली अशी चर्चा देखील रंगली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा वादळ उठणार, आता काँग्रेसचा गट फुटणार? शिंदे कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता!

Ashok Chavan : काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांबाबत अशोक चव्हाण म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Modi : पंतप्रधान मोदींची संसदीय पक्ष अध्यक्षपदी होणार निवड Results 2024Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 June 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 07 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
Monsoon 2024 : मुंबईत मान्सूनच्या सरी कधी कोसळणार? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Monsoon 2024 : मुंबईत मान्सूनच्या सरी कधी कोसळणार? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Dindori Lok Sabha: माझी विच्छा होती बुवा, राहिलो उभा! मळके कपडे, पांढरी टोपी, बिचकत-बिचकत बोलणाऱ्या 'सर' बाबू भगरेंना पडली 1,03,526 मतं
माझी विच्छा होती बुवा, राहिलो उभा! मळके कपडे, पांढरी टोपी, बिचकत-बिचकत बोलणाऱ्या 'सर' बाबू भगरेंना पडली 1,03,526 मतं
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
Embed widget