Ashok Chavan : काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांबाबत अशोक चव्हाण म्हणाले...
Ashok Chavan : काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना नांदेडमध्ये उधाण आलं आहे. पण खुद्द अशोक चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत मी काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं सांगितलं.
Ashok Chavan : काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे काँग्रेस (Congress) पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना नांदेडमध्ये (Nanded) उधाण आलं आहे. पण खुद्द अशोक चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत मी काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान या चर्चांना काही महत्त्व नाही, असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी या चर्चांवर पडदा पाडला आहे.
अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. या नव्या सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह तीन आमदार सभागृहात उशिरा पोहोचले, परिणामी ते मतदान करु शकले नाही. तर त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठिशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले होते. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे चव्हाण नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. काँग्रेस पक्षातूनच अशोक चव्हाण यांची कोंडी केली जात आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा नांदेड जिल्हाभरात रंगली होती.
चव्हाण यांच्याकडून चर्चांना पूर्णविराम
परंतु स्वत: अशोक चव्हाण यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "आज सकाळी नांदेड येथे प्रसारमाध्यमांसमक्ष मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. मी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही," असं ट्वीटही चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात अशोक चव्हाण यांच्याविषयी रंगलेल्या चर्चांना तूर्तास तरी विराम मिळाला आहे.
तर दुसरीकडे शिवसेना खासदास संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही अशोक चव्हाण यांनी निषेध केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, "राजकारणाचा स्तर सध्या घसरु लागला असून वैयक्तिक हेवेदाव्यापोटी अशा कारवाया केल्या जात आहेत."
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















