एक्स्प्लोर
राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायची इच्छा असेल, तर त्यांनी एनडीएमध्ये यावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आपल्याला आनंदच होईल. मात्र संख्याबळ पाहता विरोधी पक्षांचा उमेदवार राष्ट्रपती होईल, अशी शक्यता नाही. त्यामुळं शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं, असं आठवले म्हणाले.
यावेळी आठवलेंनी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचं पत्रकारांना जोड्यानं मारण्याचं वक्तव्य चुकीचं असल्याचंही नमूद केलं.
जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जुळवाजुळव सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement