एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हा शेवटचा पराभव, कसं लढायचं शिकलो: राज ठाकरे
मुंबई: महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि कामं हरली. निवडणुका कशा लढायच्या या तुम्ही (जनतेने) मला शिकवलात. जिंकण्यासाठी त्यांनी जे-जे केलं, ते-ते यापुढे मीही करणार. आता झालं एवढं पुरे झालं, हा पराभव शेवटचा असेल, यापुढे पराभव दिसणार नाही, असा एल्गार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मनसेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजिक मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
आता जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार, त्यांचे डाव मी खेळणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
आजचं भाषण हे आजपर्यंतचं सर्वात लहान भाषण असेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.
पैसा जिंकला, काम हरलं
महापालिका निवडणूक निकालाबाबत माझी प्रतिक्रिया विचारण्यासाठी अनेक पत्रकार संपर्क साधत होते. मात्र काय बोलायचं असा प्रश्न पडला होता. कारण निवडणुकीचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरलं, असाच होता, असं राज ठाकरे म्हणाले.
कामं करुन चूक केली
निवडणूक प्रचारात सत्ताधारी पक्ष कोणत्या थराला जाऊन भांडत होते सर्वांनी पाहिलं. नाशिकमध्ये आम्ही विकासकामं केली, ती जनतेसमोर घेऊन गेलो. मात्र तरीही आमचा पराभव झाला. नी गुंडांना तिकीटं दिली, ते निवडून आले. भाजपकडे उमेदवार नव्हते, तरीही त्यांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे कामं करुन चूक केली, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
कसं लढायचं तुम्ही शिकवला
ज्या नागरिकांनी मनसेला मतदान केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवलं. त्यामुळे यापुढे जिंकणाऱ्यांनी ज्या-ज्या गोष्टी केल्या, त्या-त्या गोष्टी यापुढे मीही करणार, तुम्ही मला कसं लढायचं हे शिकवलं, असा एल्गार राज ठाकरे यांनी केला.
यापुढे मी भेटायला येणार
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. हा आपला शेवटचा पराभव असेल. यापुढे पराभव दिसणार नाही. आपण जिंकायचंच. त्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
परिचारकसारख्या माणसांना चौकात चपलाने चोपायला हवं
जवानांच्या कुटुंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारकसारख्या माणसांना चौकात चपलाने चोपलं पाहिजे, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- आता पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव, यापुढे पराभव दिसणार नाही : राज ठाकरे
- आता जे जिंकले आहेत त्यांचे फासे मी घेणार : राज ठाकरे
- जिंकणाऱ्यांनी ज्या-ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी यापुढे मीही करणार, तुम्ही मला कसं लढायचं हे शिकवलं - राज ठाकरे
- आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत : राज ठाकरे
- नाशिकमध्ये आम्ही कामं केली, ज्यांनी गुंडांना तिकीटं दिली, ते निवडून आले : राज ठाकरे
- प्रशांत परिचारकसारख्या माणसांना चौका-चौकात चपलांनी चोपलं पाहिजे : राज ठाकरे
- भाजपकडे उमेदवार नव्हते, तरीही त्यांचे उमेदवार निवडून आले : राज ठाकरे
- मनसेच्या उमेदवारांना, मतदारांचे धन्यवाद, ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची शिकवलं : राज ठाकरे
- कामाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नसतो हे दिसलं, काम उगीच केली असं वाटतंय : राज ठाकरे
- निवडणुकीचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरलं - राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
Advertisement