एक्स्प्लोर
Advertisement
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
एकमेकांविरोधात लढलो असताना, असा दगाफटका करणं योग्य नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. मात्र यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच संतापल्याचं सांगण्यात येत आहे.
एकमेकांविरोधात लढलो असताना, असा दगाफटका करणं योग्य नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
याशिवाय मनसेचे जे 6 नगरसेवक गटनोंदणी करणार आहेत, त्यांच्या नोंदणीस परवानगी देऊ नये, असं पत्र मनसेने कोकण आयुक्तांना लिहिलं आहे.
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
दुसरीकडे मला कुणकुण लागली होती, मात्र कोण नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, याची माहिती नाही, असं मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय.
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
याशिवाय ज्या पक्षाने एव्हढं वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्याला सोडून जाणं म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं असून ही बेईमानी आहे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया बाळा नांदगावकर आहे.
मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात
मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं जोरदार धक्का दिला. मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेसोबत जाणारे 6 मनसे नगरसेवक कोण?
- अर्चना भालेराव – वॉर्ड 126
- परमेश्वर कदम – वॉर्ड 133
- अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
- दिलीप लांडे – वॉर्ड 163
- हर्षल मोरे – वॉर्ड 189
- दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
- शिवसेना अपक्षांसह – 84 + 4 अपक्ष = 88
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
- कॉंग्रेस – 30
- राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
- मनसे – 7
- सपा – 6
- एमआयएम – 2
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?
मोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान
मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी
शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement