एक्स्प्लोर
Advertisement
प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठं वक्तव्य केलं आहे.
"युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन", असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
संबंधित बातमी- कोण कुणाला कॉल करणार?
मात्र राज ठाकरे नेमकं कोणत्या पक्षासोबत युती करण्यासाठी इच्छुक आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले, मात्र शिवसेना आणि मनसे यांची कदापीही युती झाली नाही. दुसरीकडे राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपनेही वेळोवेळी प्रयत्न केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने मनसेशी युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी युती झाली नव्हती. माझा कट्टावर गौप्यस्फोट यापूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे यांनी माझा कट्टावर गौप्यस्फोट केला होता. 'शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर मी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धवशी तसं बोलणंही झालं होतं. त्यासाठी अर्जवाटपही थांबवलं. पण त्यानंतर उद्धवनं प्रतिसादच दिला नाही. साधा फोनही केला नाही. त्यामुळंच सगळं फिसकटलं,' असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. 'माझा कट्टा' या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंचं राज यांना उत्तर ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे, त्यांनी मला मेसेज किंवा कॉल करा, मी त्यांना रिप्लाय देईन, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. 2014 सालच्या भेटीगाठी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेशी युती करण्यासाठी भाजप नेते नितीन गडकरी, आशिष शेलार आणि विनोद तावडे हे कृष्णकुंजवर गेले होते. त्यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसेची मदत लागणार होती. त्यापार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र त्यावेळी भाजप-मनसेच्या युतीचीही चर्चा झाली होती. याआधी लोकसभा निवडणुकीत मनसेने मैदानाबाहेरच राहावं, यासाठी भाजपचे नेते नितीन गडकरी राज यांना मुंबईत भेटले होते. तर गोपीनाथ मुंडें यांचीही राज यांच्याशी गुप्त भेट झाल्याची चर्चा होती. यामुळे शिवसेनेने भाजप नेत्यांच्या या भेटीगाठींसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.संबंधित बातमी
कोण कुणाला कॉल करणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement