Raj Thackeray PC LIVE : भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार : राज ठाकरे
MNS chief Raj Thackeray PC LIVE : आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या आंदोलनाबाबत ते कोणती भूमिका मांडणार, कार्यकर्त्यांना कोणते नवे आदेश देणार, हे पाहावं लागणार आहे.
LIVE
Background
Raj Thackeray PC Live Updates : आज पहाटेपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसैनिकांनी आंदोलन छेडल्यानंतर या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. यासंदर्भात आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या आंदोलनाबाबत ते कोणती भूमिका मांडतात. कार्यकर्त्यांना कोणते नवे आदेश देतात हे पाहावं लागणार आहे.
मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेची 'हनुमान चालिसा'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
औरंगाबादमध्येही कडेकोट बंदोबस्त
औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेतच मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
मनसेचे नवनाथ कोठुनेंनी केली संजय राऊंत यांच्यावर टीका
त्रंबकेश्वर मंदिरात सकाळी आरती होत नाही हे विधान संजय राऊत या कोणत्या माहितीच्या आधारे केले आहे. स्वत:ला हिंदु म्हणवता मात्र हिंदूंच्या मंदिरात काय होते, कुठल्या आरती होतात तुम्हाला माहीत नाही. जनतेची दिशाभूल करू नका, असे नवनाथ कोठुने म्हणाले.
MNS chief Raj Thackeray PC : भोंग्यांचा विषय फक्त एका दिवसाचा नाही : राज ठाकरे
MNS chief Raj Thackeray PC : भोंग्यांचा विषय फक्त एका दिवसाचा नाही, भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार : राज ठाकरे
MNS chief Raj Thackeray PC : मुंबईत आज 135 मशिदींवर पहाटे पाच आधी भोंग्यांवरुन अजान, त्यावर कारवाई करणार? : राज ठाकरे
MNS chief Raj Thackeray PC : मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 1005 मशिदींवरचे भोंगे वाजले नाहीत, त्यांचं अभिनंदन, तर 135 मशिदींवर पहाटे पाचच्या आधी अजान, या 135 मशिदींवर कारवाई करणार का? : राज ठाकरे
MNS chief Raj Thackeray PC : माझ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं जातंय, हे आमच्या बाबतीच का घडतंय? : राज ठाकरे
MNS chief Raj Thackeray PC : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु
MNS chief Raj Thackeray PC : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु, मनसेच्या आंदोलनाची दिशा ठरणार