एक्स्प्लोर
क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांचं स्थलांतर नाही, महापालिका आयुक्तांचं राज ठाकरेंना आश्वासन
क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांचं स्थलांतर स्थलांतरित होत असल्याने मच्छिमार कृती समितीनं आंदोलन केलं होतं. स्थलांतराचा निर्णय मागे घ्या, अन्यथा एक ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मच्छिमारांनी दिला आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासेविक्रेत्यांचं सध्या कुठेही स्थलांतर होणार नसल्याचं आश्वासन मुंबई महापालिका आयुक्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. जर मासेविक्रेत्यांचं पुनर्वसन करायचं झालं तर मुंबईतच जवळपास करण्यात येईल असंही महापालिका आयुक्तांनी सांगितलं.
क्रॉफर्ड मार्केटजवळील सर्वात जुन्या मासेविक्रीसाठी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील विक्रेते आणि कोळी बांधवांचं स्थलांतर ऐरोलीत करण्यासंबंधी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या होत्या. त्याला कोळी बांधवांनी मोठा विरोध केलाय. कोळीबांधवांचा हा प्रश्न घेऊन राज ठाकरे महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी पुनर्वसनाचं आश्वासन दिल्याचं राज यांनी या भेटीनंतर सांगितलं.
Koli Community | कोळीबांधवांच्या पुनर्वसनासाठी राज ठाकरे आयुक्तांच्या भेटीला | ABP Majha
दरम्यान क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांचं स्थलांतर स्थलांतरित होत असल्याने मच्छिमार कृती समितीनं आंदोलन केलं होतं. स्थलांतराचा निर्णय मागे घ्या, अन्यथा एक ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मच्छिमारांनी दिला आहे.
मासे विक्रेत्यांच्या स्थलांतरणाचा घाट का?
क्रॉफर्ड मार्केटमधील मासे विक्रीच्या मंडईची इमारत धोकादायक असल्याने महापालिकेनं मासे विक्रेत्यांना स्थलांतरित करत आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीसा देखील धाडल्या आहेत. इमारत धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
