एक्स्प्लोर
'त्या' फेरीवाल्यांचं काय करायचं ते मनसैनिक पाहून घेतील : राज ठाकरे
या सर्व प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांचा पुळका येणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
मुंबई : महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मुंबईत फेरीवाले गटारात फळ-भाज्या लपवत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुंबईच्या वाकोला परिसरातील हा व्हिडीओ आहे. मुंबई महापालिकेने याची दखल घेतली असून या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
या सर्व प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांचा पुळका येणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. गटारात फळ-भाज्या लपवणारे ते फेरीवाले परप्रांतियच असल्याची खात्री आपण केली आहे. मराठी माणूस असे घाणेरडे प्रकार करुच शकत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या लोकांना काय शिक्षा द्यायची ते मनसैनिक पाहून घेतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुंबईतील फेरीवाले नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी वाकोल्यातील फेरीवाल्यांनी फळ-भाज्यांच्या पेट्या चक्क गटारात लपवल्या गेल्या. सोशल मीडियावर या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला.
तुम्ही-आम्ही विकत घेणाऱ्या फळ-भाज्या कुठे ठेवल्या जातात ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. वाकोला परिसरात पालिकेची कारवाई टाळण्यासाठी फेरीवाले रस्त्याशेजारील गटारांमध्ये फळे, भाज्यांच्या पेट्या लपवून ठेवतानाची दृश्य समोर आली आहेत.
गटाराची झाकणं काढून त्यातून फळे, भाज्यांचे बॉक्स बाहेर काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
केवळ एकच फेरीवाला नव्हे तर रांगेने सर्वच फेरीवाले अशा प्रकारे गटारात माल ठेवत असल्याचं दिसतं आहे. कारण प्रत्येक गटाराच्या झाकणाजवळून माल बाहेर काढला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत लोकल ट्रॅक शेजारील भाज्यांवर नाक मुरडणाऱ्यांना फेरीवाल्यांकडची भाजी-फळं विकत घेतानाही विचार करावा लागणार आहे.
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट
''माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरु केलं त्यावेळेला अनेकांना या फेरीवाल्यांचा कळवळा आला होता, ती पण माणसं आहेत अशी पोपटपंची अनेकांनी केली.
पण हीच माणसं काय घाणेरडे उद्योग करत आहेत हे खालच्या चित्रफितीत तुम्हाला बघायला मिळेल.
मुंबईतल्या वाकोला परिसरातल्या परप्रांतीय फेरीवाल्यांनी चक्क गटारातून फळांच्या करंड्या बाहेर काढल्या. ते परप्रांतीयच आहेत हे मी तपासून घेतलं आहे आणि माझा मराठी माणूस असले घाणेरडे प्रकार कधीच करणार नाही याची मला खात्री आहे.
ही चित्रफीत कालपासून तुम्ही वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर पाहिली असेल. तरीही मी ती इथे पुन्हा जोडत आहे. नक्की पहा, आपल्या आसपासच्या माणसांना दाखवा. आणि फक्त चित्रफीत दाखवून गप्प बसू नका. तुमच्या आरोग्याशीच थेट खेळ खेळला जातोय तेंव्हा याचा गंभीरपणे विचार करा आणि कृती करा.
पुढच्या काही क्षणांत ही चित्रफीत तुम्हाला इथे पहायला मिळेल
बाकी या ‘अश्या लोकांना’ काय शिक्षा करायची ती माझे महाराष्ट्र सैनिक करतीलच''
संबंधित बातम्या :
फळ-भाज्यांच्या पेट्या गटारात, फेरीवाल्यांचा मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ
फळ-भाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement