एक्स्प्लोर

बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या रोज वाढतेय : राज ठाकरे

ठाणे: रोज संख्या वाढणारा ठाणे हा देशातील एकमेव जिल्हा आहे. केवळ आणि केवळ बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या रोज वाढत आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात एल्गार पुकारला. ठाण्यातील दिव्यात राज ठाकरेंची प्रचार सभा झाली. उत्तर भारतीयांच्या मतांसाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गोंजारलं जातंय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला.

''ठाणे जिल्हा हा भारतातला एकमेव जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या वेगाने वाढतीये आणि ती देखील बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळें,

मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात, का तर उत्तर भारतीय मतं आहेत म्हणून त्यांना जपणार.

ठाणे हा या देशातला एकमेव जिल्हा आहे, ज्यात 7 महानगरपालिका आहेत,

कारण काय तर वाढलेली लोकसंख्या आणि ही लोकसंख्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढलीये''

राज ठाकरे

''मुख्यमंत्र्यांना 'तो' अधिकार नाही'' सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना हे आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत?, असा सवालही राज ठाकरेंनी केला.

''भाजपच्या होर्डिंगवर मुख्यमंत्री सांगतात 'हा माझा शब्द',

स्वत:च्या हिंमतीवर खुर्चीवर बसणाऱ्यांनी शब्द द्यावा,

बसवलेल्या माणसाने शब्द देऊ नये,

मोदींनी उद्या दुसरा माणूस बसवला तर तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय?''

राज ठाकरे

कल्याण-डोंबिवली महापालिकेला 6 हजार 500 कोटींचं आश्वासन दिलं, पण आजपर्यंत साडेसहा रुपये पण नाही दिले, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्यातील चारही पक्ष एकत्र बसतात आणि यांचे नेते बिल्डर आहेत, यांची सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकामं आहेत आणि टांगती तलवार जनतेच्या डोक्यावर आहे, असं राज ठाकरे म्हणाले. आयुक्त सांगतात डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न 3 महिन्यात सोडवतो आणि मुख्यमंत्री म्हणतात 1 वर्ष लागेल, मुख्यमंत्र्यांना नेमकी अडचण काय आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. ''शिवसेना-भाजपने 25 वर्षात फक्त अनधिकृत बांधकामं वाढवली'' दिव्यात गाडीकरता सोडा, साधा बैलगाडीसाठी पण रस्ता नाहीये, तरीही सेना भाजपला याचं काहीच वाटत नाही. दिव्यात इथे काही लहान मुलं आत्ता भेटून गेली, ते म्हणाले अभ्यास करताना सारखे लाईट जातात, पण याचं कोणालाच काहीच कसं वाटत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला. 25 वर्ष शिवसेना-भाजपच्या हातात ठाण्याची सत्ता आहे, पण यांनी केलं काय तर अनधिकृत बांधकामं वाढवली, त्याची टांगती तलवार आज जनतेच्या डोक्यावर आहे, असं राज ठाकरे म्हणाले. त्याच त्याच लोकांना जर तुम्ही निवडून देणार असाल तर मग अनधिकृत बांधकामं ,डम्पिंग ग्राऊंड याच्या तक्रारी करू नका, असंही राज ठाकरे म्हणाले.

''दिव्यातील काही भागातील रहिवासी ट्रेनने मुंब्र्याला जाऊन पाणी आणतात.

काय भीषण परिस्थिती आहे ही,

वीज, रस्ते, पाणी यांसारख्या सुविधा तुम्हाला वर्षानुवर्षे मिळत नसतील

तरीही तुम्ही प्रश्न विचारणार नाही?''

राज ठाकरे

''बाळासाहेबांच्या फोटोआड भ्रष्टाचार दडवू नका'' शिवसेनेने होर्डिंगवर बाळासाहेबांचे फोटो लावले आहेत आणि 'बोलतो ते करुन दाखवतो', अशी टॅग लाईन दिली आहे. पण बाळासाहेब बोलायचे ते करायचे, तो अधिकार शिवसेनेला नाही, असा घणाघात राज ठाकरेंनी केला. मुंबई, ठाण्यात शिवसेनेने जो पैसा खाल्लाय, तुमचा गलथान कारभार, बाळासाहेबांच्या फोटोआड दडवू नका, असंही राज ठाकरेंनी ठणकावलं. ''नोटाबंदीनंतरही भाजपकडेच पैसा'' नोटाबंदीमुळे एक कोटींच्यावर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाचं वाटोळं केलं पण भाजपकडे निवडणुकीच्या वेळेला कुठून पैसे येतो?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

''भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं,

विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पक्षाने उमेदवाराची इच्छा नसताना

प्रत्येकी 1 कोटी दिले होते,

म्हणजे 288 कोटी 288 उमेदवारांकरता, एवढे पैसे आले कुठून?''

राज ठाकरे

''शिवसेना-भाजप सत्तेकरता लाचार'' शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही फरक नाही. एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं, अशी परिस्थिती आहे. दोघंही भ्रष्टाचारी आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी

''शिवसेना-भाजप सत्तेकरता लाचार आहेत,

निवडणुकीला भांड-भांडले आणि नंतर पुन्हा सत्तेत मांडीला मांडी लावून बसले,

अशी परिस्थिती आहे'',

राज ठाकरे

  पाहा संपूर्ण भाषण : महत्वाचे मुद्दे : मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात, परप्रांतियांना एवढं का गोंजारता? : राज ठाकरे बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या रोज वाढतीये : राज ठाकरे ठाण्यात सगळे पक्ष एकत्र बसतात, सगळ्या पक्षांचे नेते बिल्डर आहेत : राज ठाकरे स्वतःच्या हिंमतीवर बसलेल्या माणसाने शब्द द्यायचा असतो, मुख्यमंत्र्यांना तो अधिकार नाही : राज ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत 6500 कोटी देण्याचं आश्वासन दिलं होतं, काहीच दिलं नाही : राज ठाकरे कुणीही येतं आकडे सांगतं, त्यालाच भुलून मतदान केलं जातं : राज ठाकरे ठाण्यात गाडी सोडा, बैलगाडीसारखाही रस्ता नाही : राज ठाकरे 25 वर्ष शिवसेना-भाजपच्या हातात ठाण्याची सत्ता आहे, पण यांनी फक्त अनधिकृत बांधकामं वाढवली : राज ठाकरे प्रकरण फसलंय हे समजलं म्हणून मोदींनी नोटाबंदीवर बोलणंच बंद केलं : राज ठाकरे सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना हे आश्वासनं कशाच्या आधारावर देत आहेत: राज ठाकरे करायचं ठरवलं तर सगळं शक्य आहे, पण यांची ईच्छाच नाही : राज ठाकरे जे काहीच करु शकत नाहीत, त्यांच्याचकडे पुन्हा सत्ता दिली तर तक्रार कुणाकडे करणार? : राज ठाकरे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget