एक्स्प्लोर
निवडणुकीसाठी सेना-मनसे सज्ज, उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी
![निवडणुकीसाठी सेना-मनसे सज्ज, उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी Raj And Uddhav Thackeray Ready To Mumbai Election निवडणुकीसाठी सेना-मनसे सज्ज, उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/29060954/raj-uddhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसेकडून हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखांना भेटी दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतल्या 10 शाखांना भेटी दिल्या. कुलाबा, फोर्ट, क्राफर्ड मार्केटमधील शाखांमध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही वरळी आणि भायखळ्याच्या शाखेला भेट दिली. आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. तसंच कामाला लागण्याचेही आदेश दिले. फेब्रुवारीत महापालिका निवडणुका होणार असल्यानं दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं की, आपण लवकरच मुंबईतील सर्व शाखांना भेट देणार आहोत. त्यामुळे आता शाखापातळीवर जाऊन उद्धव ठाकरे थेट मतदारांशी संवाद साधणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)