एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई लोकल LIVE: दिवा स्टेशनवर तुफान गर्दी
मुंबईबाहेर जाणाऱ्या ट्रेनच्या वेळेत बदल:
- सकाळी 8:05 ला निघणारी सीएसटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेस आज सकाळी 9:30 वाजता सुटेल
- सकाळी 7:10 ला निघणारी सीएसटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस आज सकाळी 9:00 वाजता सुटेल
- कुलाबा 69 मिमी. सांताक्रूझ 103 मिमी पाऊस
- मुंबई शहर, उपनगरात पाऊस थांबला
- कुर्ला स्थानकात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत
- पावसामुळे तीनही लोकल मार्गावरील वाहतूक उशीरानं
मुंबई: मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, मालाड, जोगेश्वरी, घाटकोपर, भांडुपमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळं ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं.
पावसाचा लोकल ट्रेनवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटांनी उशीरा धावत आहेत.
तर नवी मुंबईतही दोन तास पावसानं चांगलीच बॅटिंग केली आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईत गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला आहे. सोमवारपासून आज सकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई शहरात 24.88 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरांमध्ये 10.93 आणि पूर्व उपनगरात 27.37 मिलीमिटर पाऊस पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement