Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: प्राजक्ता माळी हिनं सोशल मीडियावर मंदिराचं वैशिष्ट्य, तसेच मंदिराची अख्यायिकाही सांगितली. त्यासोबतच तिनं मंदिरातला तिचा फोटोही शेअर केलाय.

Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: कित्येक तरुणांच्या काळजाचा ठाव घेणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ता माळीचे वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स असोत, वा प्रोफेशनल लाईफमधील तिचे प्रोजेक्ट्स, चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रीबाबत जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. अशातच प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत तिचे फोटो, प्रोजेक्ट्सचे अपडेट्स शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ता राजस्थानला गेलेली. त्यावेळी तिनं राजस्थानातील पुष्कर इथल्या जगप्रसिद्ध ब्रम्हा मंदिराला भेट दिली. त्यावेळचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत.
प्राजक्ता माळी हिनं सोशल मीडियावर मंदिराचं वैशिष्ट्य, तसेच मंदिराची अख्यायिकाही सांगितली. त्यासोबतच तिनं मंदिरातला तिचा फोटोही शेअर केलाय. यामध्ये प्राजक्तानं मंदिरात जीन्स वेअर केलीय. अभिनेत्रीनं स्वतःच्या पोस्टमध्ये स्वतः स्पष्टीकरण दिलंय. प्राजक्ता माळीनं मंदिरात जाताना तिनं जीन्स का वेअर केली? याचं स्पष्टीकरण आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच दिलंय.
प्राजक्ता माळीनं इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पोस्टमध्ये म्हटलंय की, "जगत् पिता ब्रम्हा मंदिर" - पुष्कर, राजस्थान... सबंध जगात ब्रम्हाजींची खूप कमी मंदिरं आहेत, हे सर्वात प्रसिद्ध..."
"ब्रम्हदेवानं आपल्या मंत्रोच्चारानं एक स्त्री निर्माण केलीय. तीला वाणी, बुद्धी, वेदांचं सामर्थ्य दिलं. जगातील सर्व मनुष्यांच्या जीभेवर सदैव नृत्य करशील असा आशिर्वाद दिला. ती इतकी सुंदर निपजली की जेव्हा ती प्रकटली तेव्हा स्वतः ब्रम्हदेव तीच्यावर भाळले...", असं प्राजक्ता माळीनं पोस्टमध्ये म्हटलंय.
View this post on Instagram
"स्वतः जन्म दिलेल्या मुलीवर भाळले म्हणून भगवान शिवानं त्यांना शाप दिला की, पृथ्वीवर त्यांना कोणी पूजणार नाही...", असं प्राजक्ता माळी म्हणालीय.
पुढे प्राजक्तानं म्हटलंय की, "पुणे विद्यापीठात नृत्यांचं शिक्षण घेत असताना "सरस्वती कौतूकम्"मध्ये ही कथा मी सादर करायचे, त्याची आज खूप आठवण आली... एका उःशापामुळे पुष्कर मध्ये हे मंदिरं स्थित आहे. असं म्हटलं जातं..."
यासोबतच प्राजक्ता माळीनं पोस्टच्या सुरुवातीलाच एक वाक्य लिहिलंय. त्यात तिनं म्हटलंय की, या मंदिराला भेट देणं काही नियोजित नव्हतं... पण, तिला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी गुपचूप बाहेर पडावं लागलं... आणि त्यामुळेच मंदिराला भेट देताना तिनं जीन्स घातलेली.
दरम्यान, प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. प्राजक्ता माळी लवकरच ललित प्रभाकरसोबत एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच, आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आगामी सिनेमात प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















