एक्स्प्लोर

Rabies Vaccination : मुंबईत 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण होणार; राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारीत लसीकरण

Rabies Vaccination : मुंबईत 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या लसीकरणासाठी पहिल्यांदाच अॅपचा वापर करता येणार आहे.

मुंबई : 'रेबिजमुक्त मुंबई’ साठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आणि 15 स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सहा प्रशासकीय विभागातील 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात 'क्‍यूआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्‍यात येणार आहेत. परिणामी, क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणाऱ्या (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण मोबाईल ॲपआधारित होणार असून राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली. 

आंतरराष्ट्रीय रेबिज दिवसाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी विविध स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर 15 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 29 सप्टेंबर 2023 ते 10 ऑक्टोबर 2023 या 10 दिवसांच्या कालावधीत पी दक्षिण, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एस आणि टी विभागातील जवळपास 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. केवळ लसीकरण यांवर न थांबता श्‍वानांच्‍या आरोग्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका आता अत्‍याधुनिक उपाययोजनादेखील राबविणार आहे.

वर्ष 2014 मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे 95 हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे एक लाख 64 हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्‍वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी,  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे आणि उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे यांच्या मार्गदर्शनात  मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या श्‍वानांच्‍या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. 

भटक्या श्वानांचे सर्वेक्षण होणार 

दर दहा वर्षांनी श्वान जनगणना होते. त्यानुसार जानेवारी 2024 मध्ये मुंबईतील भटक्या श्‍वानांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी 2024 मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहीम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे एक लाख भटक्या श्‍वानांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे. 

अॅपद्वारे माहिती जमा होणार 

मोबईल ॲपच्या माध्यमातून भटक्या श्वानांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या सहायाने श्‍वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणीदेखील करण्यात येणार आहे. तसेच लसीकरण करण्यात आलेल्या श्वानाचा फोटो, लसीकरण करण्यात आलेले ठिकाण आणि त्याच्या आरोग्याची माहिती या मोबाईल ॲपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  

या उपक्रमासाठी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, द वेलफेयर ऑफ स्ट्रे डॉग्स, मिशन रेबिज, वर्ल्ड वाइल्ड वेटरनरी सर्विस, बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट प्राण्यांचे रुग्णालय, अहिंसा, जीवदया अभियान, मुंबई ॲनिमल असोसिएशन, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, युथ ऑरगनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, उत्कर्षा ग्लोबल फाउंडेशन, ॲनिमल मॅटर्स टू मी, जीव रक्षा अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्ट, जेनिस स्मिथ ट्रस्ट, वर्क फॉर केअर ॲनिमल फाउंडेशन आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या स्‍वयंसेवी संस्था निःशुल्क सेवा देत आहेत. तसेच बोरिजर इंगलहाईम ही संस्था मोफत लस पुरवठा करणार आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget