एक्स्प्लोर

कमला मिल प्रकरणावरुन मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली

कमला मिल अग्नितांडवावरुनही विधानसभेत आज पुन्हा मुख्यमंत्री आणि जयंत पाटील आमनेसामने आले. कमला मिलची जागा आघाडी सरकारच्या काळात मिल मालकाच्या घशात घालण्यात आली, त्यामुळे कमला मिल प्रकरण हे मागच्या सरकारचं पाप आहे, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन सादर केलं.

मुंबई : कमला मिल अग्नितांडवावरुनही विधानसभेत आज पुन्हा मुख्यमंत्री आणि जयंत पाटील आमनेसामने आले. कमला मिलची जागा आघाडी सरकारच्या काळात मिल मालकाच्या घशात घालण्यात आली, त्यामुळे कमला मिल प्रकरण हे मागच्या सरकारचं पाप आहे, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन सादर केलं. मुख्यमंत्र्यांच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील चांगलेच संतापले. कमला मिलला आग का लागली, कोणामुळे लागली, त्यांना सरकार पाठीशी घालतंय का हेही मुख्यमंत्र्यांनी तपासावं अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कमला मिल प्रकरणावर आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. कमला मिलमध्ये 1999 च्या पॉलिसीनुसार मिल बंद पडल्यानंतर 40 टक्के म्हाडा, 30 टक्के महानगरपालिका आणि उर्वरित मिल मालक अशी तरतूद होती. मात्र आघाडी सरकारच्या काळात 2001 साली संपूर्ण मिलची जागा मिल मालकांच्या घशात घालण्याचा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे कमला मिल प्रकरण हे मागच्या सरकारचं पाप आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आयटी पॉलिसीनुसार मिल मालकांना अधिक FSI का देण्यात आला याची चौकशी केली जाईल. तसंच 34 वॉर्ड ऑफिसने फायर कंपलाईन्स होते की नाही हे तपासण्यासाठी आता यंत्रणा उभी करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील सर्व अवैध बांधकाम तोडण्यात येत आहे, चौकशी समिती याचा पूर्ण तपास करणार असल्याचंही मुख्यंमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांची विधानसभेत जुगलबंदी दरम्यान गिरणी कामगारांची जागा मागच्या सरकारने खाऊन टाकली, पण आम्ही नियमात बदल करुन म्हाडा, बीएमसीला जागा देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच त्याठिकाणी गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोणाची कुठे, कधी आणि कशी चौकशी करावी, ते करण्याचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र मूळ आग का लागली, कोणामुळे लागली, त्यांना पाठीशी घालण्यापेक्षा नको तो इतिहास मुख्यमंत्री काढत बसले असा पलटवार जयंत पाटील यांनी केला. तसंच आम्ही कुठल्याही चौकशीला घाबरत नसल्याचंही स्पष्ट केलं. मात्र मी चौकशीबाबत बोलल्यावर तुम्हाला एवढी आग का लागली असा खडा सवालच मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना विचारला. तसंच जे सत्य आहे ते मी बोलणारच, मला सत्य बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी पुस्तीही जोडली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget