एक्स्प्लोर
Advertisement
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार
काही खातेदारांच्या संगनमताने 1.77 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 11 हजार 357 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं पंजाब नॅशनल बँकेने सांगितलं.
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. अंदाजे 11 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याची माहिती बँकेने पत्र लिहून मुंबई स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे.
काही खातेदारांच्या संगनमताने 1.77 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 11 हजार 357 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं पंजाब नॅशनल बँकेने सांगितलं. काही अनधिकृत आणि संशयास्पद व्यवहार झाल्याचं बँक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ही माहिती देण्यात आली.
इतर बॅंकांकडूनही या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये परदेशात पैसा पाठवला. हा प्रकार उघड होताच 'पीएनबी'ने याची रितसर तक्रार केली. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण व्हायला सुरुवात झाली.
दोषींना शिक्षा देण्यात येईल, असा विश्वास पंजाब नॅशनल बँकेने व्यक्त केला आहे. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement