एक्स्प्लोर

भोसरी जमीन घोटाळा: एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

Mandakini Khadse News : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत.याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे.

Pune Bhosari Land Scam : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलेला दिलासा पुन्हा एकदा 16 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. वेळोवेळी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी कोर्टाला दिली, याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सोमवारी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

खडसे कुुटुंबियांविरोधात ईडीकडनं याप्रकरणी आरोपपत्र केलेलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी याप्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय, असा आरोप केला होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं चौधरींचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल 2016 मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती, मात्र एसीबीनं खडसेंना क्लीन चीट दिलेली आहे.

काय आहे प्रकरण 

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

Jalgoan News : मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ, जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर कारवाईचे आदेश

पुणे भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget