Sanjay Rathod : माध्यमांशी बोलू नका, मंत्री संजय राठोड यांना शिवसेनेकडून तंबी!
Puja Chavan suicide case : पूजा चव्हाण प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना तंबी देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलू नका, असे आदेश राठोडांना पक्षाकडून देण्यात आले आहेत.
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना तंबी देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलू नका, असे आदेश राठोडांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. घटना गंभीर असल्यानं राठोडांचं वक्तव्य आणखी अडचणी वाढवू शकतात, त्यामुळे पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. भाजप आक्रमक असताना राठोड यांच्या कुठल्याही वक्तव्यानं पक्षाची अडचण होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असताना आणखी एक मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - भाजप
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी थेट पोलीसांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. पोलीस कोणाची वाट बघत होते, हातावर हात धरून का बसले होते? सुमोटो अंतर्गत गुन्हा का नाही दाखल केला. बारा ऑडिओ क्लीप बाहेर आल्या त्या प्रत्येक क्लीपचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. शक्ती कायदा येतोय त्याचे स्वागत आहे. मात्र कायदे बनवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नसेल तर महाराष्ट्रातील महिला आणि मुली सुरक्षित होणार नाहीत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
पूजाची लहान बहिण दिया चव्हाण म्हणते... पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये अद्याप तिच्या कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र पूजाची लहानी बहिण दिया चव्हाण तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यात तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असे पोस्ट मध्ये टाकले आहे. हे इंस्टाग्राम अकाउंट दियाचे असले तरी ही पोस्ट तिनेच टाकली एका या बाबतीत मात्र अद्याप कुटुंबीय आणि दियाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून संजय राठोड यांचे नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या बाराखडी पोलिसांकडे दिले असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र यानंतरही कुटुंबातला कुठलाही व्यक्ती या प्रकरणावर बोलायला तयार नव्हता.. आता वेगळं वळण आलं असून कालपर्यंत तिच्या घरातून कसल्याही प्रकारची प्रक्रिया व्यक्त होत नव्हत्या परंतु तिच्या लहान बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती. ती असं करु शकत नाही. आणि जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे दियाची इन्स्टाग्राम पोस्ट..
2 दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे.ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा.
संबंधित बातम्या