एक्स्प्लोर

नेस वाडियांना दिलासा, प्रीती झिंटाने दाखल केलेला गुन्हा रद्द होणार

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया हे दोघेही या सुनावणीसाठी दालनात हजर होते. 2014 साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. प्रीतीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने उद्योजक नेस वाडियाला मोठा दिलासा दिला आहे. अभिनेत्री प्रीती झिंटानं नेस वाडियांविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश हायकोर्टानं दिला आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे यांच्या चेंबरमध्ये बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता ही सुनावणी झाली. प्रीती झिंटा आणि नेस वाडिया हे दोघेही या सुनावणीसाठी दालनात हजर होते. 2014 साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. प्रीतीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती. नेमक्या कोणत्या कारणामुळे हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दोन्ही बाजूच्या वकिलांनीही नेसनं माफी मागितली की नाही हे सांगण्यास कोर्टाने मनाई केली असल्याचं सुनावणीनंतर बाहेर आल्यावर सांगितलं. त्यामुळे नेसनं माफी मागितली की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नेसनं माफी मागण्याची तयारी दाखवली तर आपण केस मागे घेऊ, असं प्रीतीच्या वतीनं हायकोर्टाला गेल्या सुनावणीवेळी सांगण्यात आलं होतं. तर नेसनं मात्र माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांचे वकील आभात फोंडा यांनी म्हटलं होतं. या सगळ्या प्रकरणातून प्रीती झिंटा केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आभात फोंडा यांनी केला होता. मात्र आम्ही लेखी माफीची अपेक्षाच करत नाही, असं प्रीतीच्या वकिलांनी स्पष्ट केलं होतं. यावर झालं तेवढ पुरे झालं आता हे प्रकरण समोपचारानं मिटवा असं मत व्यक्त केलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं चार वर्षांपूर्वी उद्योजक मित्र नेस वाडिया याच्या विरोधात  दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांनी 200 पानी आरोपपत्र मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेड कोर्टात दाखल केलं होतं. आयपीसी कलम 354 म्हणजे हल्ला करणं, कलम 503 गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणं, कलम 509 विनयभंग करणे या कलमांअतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यावेळी नेस कोर्टात हजर होता. त्याला 20 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं. त्यानंतर खटला सुरू होण्याआधीच नेस वाडियानं आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव होती. 30 मे 2014 रोजी पंजाब एलेव्हन किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना प्रीती झिंटाला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून वाडिया यांनी तिकीट वाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांदेखत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रीतीनं आपली जागा बदलली. पण त्यानं नेसचं समाधान झालं नाही. त्यांनी सगळ्या टीम सदस्यांच्यादेखत आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केलं असा आरोप प्रीतीनं केला आहे. तसेच, आपले हात जोरात खेचत आपल्यावर नेसनं हल्ला केला असा आरोप प्रीतीनं केला होता. नेसनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. 2005 ते 2010 दरम्यान प्रीती आणि नेस एकमेकांना डेट करत होते. पण 2010 साली ते वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. आयपीएलमधल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे संयुक्त मालक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
FDA Action On Mumbai Hotel: मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDA ची कारवाई, परवाना निलंबित; कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDA ची कारवाई, परवाना निलंबित; कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget