एक्स्प्लोर

परिचारकांबाबत सरकारची भूमिका काय?: पृथ्वीराज चव्हाण

जी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिचारकांबाबत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.

मुंबई: सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ही मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षांनी आजही लावून धरली. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिचारकांबाबत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य असल्याने, त्यांच्याबाबत त्या सभागृहात निर्णय होईल. तो निर्णय विधानसभेत कळवला जाईल, असं सांगितलं. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा प्रश्न उपस्थित करत, परिचारक यांनी सभागृहात नव्हे तर बाहेर वक्तव्य केल्याने त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, असं म्हटलं. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारकांचं वक्तव्य निषेधार्ह आहेच, त्याबाबत कारवाई व्हावी असं म्हटलं. त्यानंतर मग पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. शिवसेनेचं वॉकआऊट दरम्यान, प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ही मागणी शिवसेनेने लावून धरली. या मागणीबाबत विचार न झाल्याने, शिवसेनेच्या काही आमदारांनी सभागृहातून बाहेर पडणं पसंत केलं. परिचारकांचं निलंबन मागे घेतल्याने वाद जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 28 फेब्रुवारीला आपला अहवाल सभागृहात ठेवला. प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. परिचारक यांचं निलंबन मागे घेतल्याने, सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, त्यांचं निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली आहे. काय आहे प्रकरण? महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता. “पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं. संबंधित बातम्या आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे  परिचारकांबाबत विरोधकांसह शिवसेनेचा दुतोंडीपणा उघड अखेर प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित!  ..तोपर्यंत परिचारकांना निलंबित करु : चंद्रकांत पाटील परिचारकांचं निलंबन करा, विधानपरिषदेत सर्वपक्षीयांची मागणी सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली ‘ते’ वक्तव्य अनवधानानं निघालं’, परिचारकांचा माफीनामा

महत्त्वाच्या बातम्या

सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Embed widget