Prakash Shendge on Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगात सगळे सदस्य मराठा भरले, आयोगाचा अहवाल बोगस; प्रकाश शेंडगे यांचा आरोप
Prakash Shendge on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय.
Prakash Shendge on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. दरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी सरकारने पास केलेल्या कायद्यावर टीका केली आहे. शिवाय, त्यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बोगस
मागासवर्गीय आयोगामध्ये सगळे मराठा सदस्य भरुन शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली चुकीच्या पद्धतीने हा अहवाल तयार करण्यात आलाय, असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग बोगस आहे. दहा टक्के आरक्षण तुम्ही मराठा समाजाला देत आहात. मात्र ते कायद्याच्या चौकटी टिकणार का? असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केलाय. या विधेयकासंदर्भात राज्य सरकारने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. जर आरक्षण 50 टक्क्यांच्या वरती जात असेल आणि मराठा समाज जर मागासवर्गीय आहे, असे तुम्ही म्हणत असाल तर ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील, असे प्रकाश शेंडगे यांनी नमूद केलंय.
ओबीसी समाजावर अजून एक टांगती तलवार
दहा टक्के स्वतंत्र मराठा आरक्षण देणे म्हणजे ओबीसी समाजावर अजून एक टांगती तलवार आहे. जरांगे पाटील यांच्याकडे मोठे विधीतज्ञ आहेत. त्यांची मागणी असेल ही ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर आम्ही सुद्धा या विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिलाय.
जरांगे-पाटील काय म्हणाले?
करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच आहोत. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण (OBC Reservation) आम्हाला हवे आहे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाज हलाखीचे जीवन जगतोय. मुख्य प्रवाहात मराठा समाजाला आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच हे आरक्षण देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या उणीवा दाखवल्या होत्या त्याची पूर्तता करण्यात आली आहे, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या