एक्स्प्लोर

मुंबईत महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये 51 टक्क्यांनी वाढ

महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात करण्यात आला आहे.

मुंबई : प्रजा फाऊंडेशन या संस्थेने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा लेखाजोखा समोर आणला आहे. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या  घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा यामध्ये करण्यात आला आहे. 2014 ते 2019 पर्यंतचा हा अहवाल असून यामध्ये बलात्कार, महिलांशी छेडछाड आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास 51 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात गेल्या काही वर्षांची सरासरी पहिली तर लहान मुलांवर झालेल्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये जवळपास 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणांपैकी 90 टक्के प्रकरणांमध्ये लहान मुलांवर अत्याचार करणारी व्यक्ती ही त्यांच्या परिचयाची असल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील पाच वर्षात महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराची एकूण प्रकरणे - 784 लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणं - 540 90 टक्के अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये आरोपी व्यक्ती ही पीडितांच्या ओळखीची असते 59 टक्के प्रकरणांमध्ये गुन्ह्याची माहिती पोलिसांना देण्यात नागरिकांची माघार या प्रकरणांमध्ये न्या मिळवून देण्यासाठी सरकारी वकिलांची 15 पदे मंजूर केली आहेत. परंतु केवळ एकच कायम सरकारी वकील कार्यरत 50 कंत्राटी सरकारी वकिलांची पदे मंजूर असतानाही फक्त 36 कंत्राटी सरकारी वकिलांची भरणा प्रजा फाऊंडेशनने समोर आणलेल्या माहितीनंतर मुंबईत महिला आणि लहान मुले खरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई शहरात 2017 साली दाखल झालेल्या 1 लाख 5 हजार 404 प्रकरणांपैकी जवळपास 70 टक्के प्रकरणं वर्षअखेरपर्यंत प्रलंबित होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणांचा तपास करणारी यंत्रणा कमी पडत असल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे. जुलै 2019 पर्यंतच्या माहितीनुसार या प्रकरणांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकांची 41 टक्के पदे रिक्त आहेत. तर पोलीस निरीक्षकांची 28 टक्के पदे रिक्त असल्याची माहिती प्रजाने आपल्या अहवालात मांडली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget