एक्स्प्लोर

BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घराची किंमत किती? मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच केली

BDD Chawl Redevelopment Police House:  बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना 15 लाख रुपयांत घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

BDD Chawl Redevelopment Police House:  मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा बुधवारी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराची किंमतच जाहीर केली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. 

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की, पोलिसांना घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यात आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हेदेखील पाहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

बुधवारी उपमुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली?

विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बीडीडी चाळपुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला असल्याची घोषणा केली. पोलीस बांधवांना 50 लाख  किंवा 25 लाख रुपयात घरे परवडणार नाही त्यामुळे त्यापेक्षा कमी किंमतीत घर देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

पोलिसांना मोफत घरे नाही

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलिसांना मोफत घरे द्यावी अशी मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली होती. मीदेखील या मताचा होतो. मात्र, विभागाशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. पोलिसांना मोफत घरे दिल्यानंतर शासकीय कर्मचारीदेखील हीच मागणी करतील आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या पुनर्विकास योजनेत बीडीडी चाळीतील रहिवाशांना 500 चौफूटाचे मोफत घरे देण्यात येणार आहेत. मात्र, पोलिसांच्या घराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महाविकास आघाडी सरकारने पोलिसांसाठी 50 लाख रुपयांत घरे देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर याला विरोध होऊ लागला. या विरोधामुळे 50 लाखांहून किंमत कमी करत 25 लाखात घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis and Krishnaraaj Mahadik: फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
Mumbai Local Train Diva Crowd: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली, दिवा स्थानकात प्रचंड गर्दी, PHOTOS पाहून चक्रावून जाल
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली, दिवा स्थानकात प्रचंड गर्दी, PHOTOS पाहून चक्रावून जाल
Mira Bhayandar Crime News: लग्नाचं आश्वासन देऊन ऑफिस, लॉजवर महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले, भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नाचं आश्वासन देऊन ऑफिस, लॉजवर महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले, भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Embed widget