एक्स्प्लोर
वसईत दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना कॉल, पाठलाग करताच सत्य उघड
पालघर जिल्हा पोलिस कंट्रोल रुमला आलेल्या एका कॉलने जिल्ह्यात सोमवारी एकच खळबळ उडवली होती. कॉल होता वसईत दहशतवादी घुसल्याचा.
![वसईत दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना कॉल, पाठलाग करताच सत्य उघड Police pick up the trail of 'Terrorist' in Vasai; turns out to be movie actor in costume वसईत दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना कॉल, पाठलाग करताच सत्य उघड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/29122124/Vasai-Terrorist-Rumors.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वसई : वसईमध्ये दहशतवादी घुसल्याच्या माहितीने संपूर्ण पालघर जिल्ह्यात सोमवारी (27 मे) भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पालघर पोलिसांनी तात्काळ लावलेली नाकाबंदी आणि तपासलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अवघ्या 40 मिनिटात तो दहशतवादी नसून सिनेमाचा कलाकार असल्याचं सिद्ध झालं. मात्र यामुळे गेले दोन दिवस सोशल मीडियात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
पालघर जिल्हा पोलिस कंट्रोल रुमला आलेल्या एका कॉलने जिल्ह्यात सोमवारी एकच खळबळ उडवली होती. कॉल होता वसईत दहशतवादी घुसल्याचा. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वसई पश्चिमेकडील असलेल्या भारत बँकेचे सुरक्षारक्षक अनिल महाजन यांना एक व्यक्ती हत्यारं घेऊन वावरत असलेला दिसला. संबंधित व्यक्ती दिसण्यावरुन आणि हालचालीवरुन दहशतवादी आहे, असं वाटल्याने सुरक्षारक्षकाने तात्काळ आपल्या भावाला फोन केला. भावाने त्यांना पालघर जिल्ह्याच्या पोलिस कंट्रोल रुमचा फोन दिला. फोनाफोनी झाल्यानंतर सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागून तपास सुरु केला.
सुरक्षारक्षकाने दिलेल्या वर्णनावरुन संबंधित व्यक्तीचा तपास सुरु झाला. पालघर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी लावली. तसंच ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणीही सुरु केली. तर दुसरीकडे दहशतवादी दिसलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यास सुरुवात केली. हे करत असताना बाबासाहेब आंबेडकर चौक इथे असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये त्याच वर्णनाचा व्यक्ती दिसला. तो ज्या वाहनामध्ये बसून पुढे गेला होता, त्या वाहनाचा क्रमांक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला.
त्याचा पाठलाग करता करता पोलिस सनसिटी इथे पोहोचले. विशेष म्हणजे तिथे सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी संबंधित व्यक्ती दहशतवादी नसून सिनेमात काम करणारा कलाकार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. वसईच्या सनसिटी इथे शूटिंगसाठी आलेला, हा कलाकार चुकीने त्या भागात गेला. शूटिंगसाठी परवानगी घेतली होती का याचीही तपासणी पोलिसांनी केली आणि या संशयकल्लोळाला पूर्णविराम मिळाला. पण सोशल मीडियावर अजूनही संशयाचं भूत वावरताना दिसत आहे.
![वसईत दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना कॉल, पाठलाग करताच सत्य उघड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/29122400/Bharat-Bank-Bodyguard-1024x694.jpg)
![वसईत दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना कॉल, पाठलाग करताच सत्य उघड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/29122252/Vasai-Terrorist-Rumors-1-1024x573.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)