एक्स्प्लोर
Advertisement
गर्लफ्रेण्डशी लग्नासाठी पोलिसांचा खबऱ्या झाला सोनसाखळीचोर
मुंबई : गर्लफ्रेण्डसोबत लग्नासाठी पैसे मिळवता यावेत, म्हणून पोलिसांचा खबऱ्यात सोनसाखळीचोर झाल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. पोलिसांनी एका तरुणीसह चौघा सोनसाखळीचोरांना मालाडच्या रेस्टॉरंटमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.
धनराज उर्फ बिट्टू या 21 वर्षीय खबऱ्यासह त्याची 26 वर्षीय गर्लफ्रेण्ड पूनम आणि दोन तरुणांना अटक झाली आहे. चौघांवर मुंबईत शिवाजी पार्क, वर्सोवा, समतानगर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. 'मिड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पोलिस सोनसाखळीचोरांची धरपकड कशी करतात, ही पोलिसांच्या तपासाची पद्धत लक्षात घेऊन बिट्टू चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. दागिने विकून खाणंपिणं, कपडे आणि ड्रग्जवर हा पैसा उधळला जात असे.
प्रेमासाठी कायपण :
बिट्टू वयाच्या 16 व्या वर्षापासून पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करत असे. बिट्टू 21 वर्षांचा आहे तर त्याची गर्लफ्रेण्ड पूनम 26 वर्षांची. तिच्याशी लग्न करण्यासाठी पैसे जमा करता यावेत, म्हणून सोनसाखळीचोरीचा मार्ग दोघांनी अवलंबला.चोरीची पद्धत :
बिट्टू बाईकवर बसून परिसराची रेकी करायचा. एखादी सोनसाखळी घातलेली महिला दिसली, की तिचा पाठलाग करायचा. तिच्या जवळ जाताच मागे बसलेली पूनम गळ्यातली सोनसाखळी खेचायची. पूनमला वेळ नसल्याच चौकडीतले उर्वरित दोघं तिचं काम करायचे. त्यांनी मोबाईलही चोरल्याची माहिती आहे. त्यांनी चोरलेली सुमारे 31 हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. रेल्वेट्रॅकजवळ एका दगडाखाली त्यांनी ही सोनसाखळी लपवली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement