एक्स्प्लोर

सीडीआर प्रकरण : खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सीडीआर लीक केल्याप्रकरणी सखोल चौकशीसाठी पोलिसांनी रजनी पंडित यांच्या कोठडीची मागणी केली होती.

ठाणे : सीडीआर लीक प्रकरणी महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज हे आदेश दिले आहेत. सीडीआर लीक केल्याप्रकरणी सखोल चौकशीसाठी पोलिसांनी रजनी पंडित यांच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभागाची माहिती समोर आली होती. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल मंगळवारी एबीपी माझाशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांसह मोबाईल कंपन्यांचे काही अधिकारीही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. मोबाईल कंपन्यांचे अधिकारीच थेट गुप्तहेरांना सीडीआर उपलब्ध करुन देत होते. यासंदर्भात चौकशी सुरु आहे. मात्र मोबाईल कंपन्या चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांनी यापुढे चौकशीला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाख केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. व्हीआयपी नंबरही समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय काल सीडीआर लीक प्रकरणात व्हीआयपी नंबरचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मिळवल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून उघड झाली होती. पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरु केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात समोर आलेल्या नावांमध्ये अभिनेते, राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्ती असण्याची शक्यता आहे. या सीडीआरचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. मला नाहक त्रास दिला जातोय : रजनी पंडित मला नाहक त्रास दिला जात आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत असं म्हणत महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांनी आरोप फेटाळले आहेत. तसंच आपण कायद्याबाहेर जाऊन कोणतंही काम केलेलं नाही किंवा लपवाछपवीही केली नसल्याचा दावाही पंडित यांनी केला आहे. सीडीआर पुरवणारा अजिंक्य नागरगोजे ताब्यात सीडीआर लीक प्रकरणी अजिंक्य नागरगोजे याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने 111 सीडीआर पुरवल्याची माहिती आहे. अजिंक्य नागरगोजे ठाणे पोलिसांना सायबर एक्स्पर्ट म्हणून मदत करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने हॅकिंगद्वारे पोलिसांच्या सायबर सेलचा एक्सेस मिळवला होता. संबंधित बातम्या : CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget