PMC Bank Scam Investigation Live Updates: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयाबाहेर, साडेतीन तासाच्या चौकशीनंतर वर्षा राऊत बाहेर

PMC Bank Scam: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत.ईडी कार्यालयाबरोबर हळूहळू शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 04 Jan 2021 09:24 PM

पार्श्वभूमी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या उद्या 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी दाखल होणार होत्या. मात्र त्या आजच ईडी कार्यालयात...More

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या तब्बल साडे तीन तास ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊन पावणे आठ वाजताच्या दरम्यान घरी परतल्या. त्यांच्यासोबत आमदार सुनील राऊत देखील होते.यावेळी त्यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा ही तैनात करण्यात आला होता