एक्स्प्लोर
Advertisement
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 5 चं कल्याणमध्ये भूमिपूजन
छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करत कल्याणमध्ये मेट्रो 5 च्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण-भिवंडी-ठाणे मार्गाला जोडणाऱ्या मेट्रो 5 आणि मेट्रो 9 च्या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईच्या विस्तारित भागाला जोडणारा हा फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प मानला जातो. यावेळी मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. 2022-23 पर्यंत पावणेतीनशे किलोमीटरचे मेट्रो मार्ग उपलब्ध होतील, असा दावाही मोदींनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करत मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
छोट्या शहरातून आलेल्या लोकांची स्वप्नपूर्ती करण्याचं काम मुंबई-ठाणे या शहरांनी केलं. मुंबईत विकास होत आहे, पण पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांत उपनगरातील भागांना जोडण्याचं काम आम्ही सुरु केलं, असं मोदी म्हणाले.
दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार : मुख्यमंत्री
वाहतूक हा विकासाचा महत्वाचा घटक आहे. जगातील विकसित होणाऱ्या टॉप 10 शहरात सर्व भारतातील शहरं आहेत. मुंबई हे आर्थिक घडामोडींचे केंद्र असून येणाऱ्या काळात यात वाढ होणार आहे. त्यामुळे लोकलशिवाय इतर पायाभूत सुविधांवर आम्ही भर दिला. यामध्ये मेट्रो सगळ्यात वेगाने विकसित होत आहे, असंही मोदींनी सांगितलं. मागच्या आठ वर्षात मेट्रोची कामं का रखडली होती? असा सवालही नरेंद्र मोदींनी मेट्रोच्या भूमिपूजनानंतर उपस्थित केला. मेट्रोचं पहिलं काम 2014 साली सुरु झालं. आम्ही मुंबईत मेट्रोचा स्पीड आणि स्केल वाढवलं. 2022-23 पर्यंत पावणेतीनशे किलोमीटरचे मेट्रो मार्ग उपलब्ध होतील, असा दावा करताना सर्वांचा प्रवास सुखकर आणि समाधानी होण्यासाठी व्यापक प्रयत्न होत असल्याचंही मोदींनी सांगितलं. देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात असताना प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचं छत असावं, यासाठी गृह प्रकल्प तयार होत आहेत. या ठिकाणी 90 हजार घरांचा प्रकल्प पुढच्या तीन वर्षांत पूर्ण होईल. मागच्या सरकारने फक्त 35 लाख घरं बांधली तर आमच्या सरकारने 1 कोटी 25 लाख घरं बांधली, म्हणजेच 5 पट जास्त घरं बांधली, असा दावाही यावेळी मोदींनी केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरात लाखो घरं बनवली जात आहेत. हा प्रकल्प आदर्श सोसायटी सारखा नसून खऱ्या अर्थाने 'आदर्श सोसायटी' आम्ही तयार करत आहोत, असा टोलाही मोदींनी लगावला. मागच्या 7-8 महिन्यात नवं घर विकत घेण्याचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गृहकर्जावर व्याज दर कमी केले आहेत. आधी आश्वासनं वेगळी दिली जात होती, आणि डिलिव्हरी भलतीच होत होती, या प्रवृत्तीला आम्ही रोख लावल्याचा दावाही मोदींनी केला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement