एक्स्प्लोर
30 डिसेंबरनंतर काळे पैसेवाल्यांचं जगणं मुश्कील होईल : मोदी
मुंबई: देशातील भ्रष्टाचार आणि काळापैसा संपवण्यासाठी आम्ही 8 नोव्हेंबर रोजी एक मोठी लढाई सुरु केली आहे. या लढाईत देशातील सर्वसामान्य जनता सेनापती म्हणून सहभागी झाली आहे. आता ही लढाई जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही, असा एल्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत केला.
पंतप्रधान म्हणाले की, "मी गोव्यामधील कार्यक्रमात देशातील जनतेकडून 50 दिवस मागितले होते. या काळात देशातील जनतेने भरपूर त्रास सहन केला आहे. पण 50 दिवसांनंतर त्यांचा हा त्रास कमी होईल. जे अप्रामाणिकपणे पैसे कमावत आहेत, त्यांचं जगणं मुश्किल होईल. त्यांनी वेळीच सावध व्हावं. असा इशाराही दिला.
पंतप्रधानांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करताना, शिवाजी महाराजांना वंदन केले. ते म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकीत पक्षाची धुरा माझ्याकडे दिली. त्यावेळी मी सर्वप्रथम रायगडावर येऊन, शिवरायांच्या समाधीला वंदन केलं.''
शिवरायांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी
''आजपर्यंत आपण इतिहासकार आणि चित्रकारांच्या नजरेतून शिवरायांचे जी प्रतिमा आपल्या मनात साकार केली, ती एक योद्धा म्हणून होती. पण शिवरायांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी संघटन कौशल्याचा जो आदर्श घालून दिला, तो सर्वांना सदैव प्रेरणादायी आहे. तसंच त्यांनी व्यवस्थापनाचे जे धडे दिले, ते आजच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगाचे आहेत. सागरी सीमांच्या रक्षणासंदर्भात त्यांनी नौदलासमोर आदर्श वस्तूपाठ जनतेला घालून दिला.
किल्ल्याचे संवर्धन करण्यात असमर्थ ठरलोत
राज्यातील गडकोट किल्ल्यांसदर्भातही बोलताना ते म्हणाले की, आजही पर्यटनाचा विषय येतो, तेव्हा ताजमहालचे सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पण देशातील अनेक राजे-महाराजांनी आपले राजवाडे, गडकोट किल्ल्याच्या माध्यमातून जो ठेवा आपल्याला दिला, त्याचे जतन करण्यात आपण असमर्थ ठरलो अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. पण पुरातत्व खात्याला सांगून यामधूनही काही मार्ग काढून देशातील सर्व गडकोट किल्लेही पर्यटन क्षेत्रे होतील काय याकडे लक्ष देऊ.असेही यावेळी म्हणाले.
मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्याप्रमाणावर प्रकल्पाचा शुभारंभ
मुंबईमध्ये आज शुभारंभ झालेल्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ''आज या मंचावरुन ज्या प्रकल्पाचा शुभारंभ होतोय, त्याची प्रकल्पांची किंमत एक लाख सहा हजार कोटी रुपये आहे. मुंबईत इतक्या मोठ्याप्रमाणात प्रकल्पाचा शुभारंभ होणारी मुंबईतली मोठी घटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीतील यशाबद्दल आभार
यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला दिलेल्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ''नोटाबंदीच्या निर्णय घेतल्यापासून सव्वाशे कोटी देशवासीयांना त्रास सहन करावा लागला. पण एका क्षणासाठीही त्यांनी माझी साथ नाही सोडली. त्यांना अनेकांनी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जराही न भिक घालता, त्यांनी देशाच्या भल्यासाठी साथ दिली.
बँकवालेही फसणार
हा निर्णय अयशस्वी होण्यासाठी अनेकांनी षडयंत्र रचली. यामध्ये बँकवाल्यांनाही सहभागी करुन घेतलं. पण त्यांचाही बळी दिला आणि तुम्हीही आडकलात. ज्या बँकवाल्यांनी अशा माणासांना साथ दिली तेही यातून सुटणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अप्रामाणिक लोकांनी लवकरच सावध व्हावे
नोटाबंदीच्या निर्णयानंतर गोव्यातील सभेत जनतेकडून 50 दिवस मागितले होते. यावेळी प्रमाणिक लोकांना त्रास झाला. पण आता त्यांचा हा त्रास कमी होईल, आणि जे अप्रमाणिक आहेत, त्यांचा त्रास वाढेल. त्यामुळे अशा लोकांनी लवकरच सावध व्हावे. देशाच्या कायद्याला, नियमांना मान्य करुन कायद्याने वागा, आणि सुख समाधानानं जीवन जगा. हे सरकार तुम्हाला सुळावर चढवणार नाही. पण गरिबाच्या हिश्श्याचं त्यांना दिल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही. ३० वर्षानंतर हिदुस्तानातील जनतेने भ्रष्टाचार संपवण्याचं सरकार निवडून दिलं आणि सरकार हे करेल.
कळ्या पैशांच्या विरोधातील लढ्यात सव्वाशे कोटी जनता सेनापती म्हणून लढायला निघाली आहे, आणि ही लढाई जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत थांबणार नाही. असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement