विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करत भाजपकडून प्रचारासाठी सक्ती? मुलाच्या व्हायरल VIDEO वर पीयुष गोयल यांचं स्पष्टीकरण
Piyush Goyal on Viral Video: कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करत भाजपकडून प्रचारासाठी सक्ती करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या व्हिडीओवर पीयुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : शिवसेना हतबल पक्ष, ज्याचं अस्तित्व आज संपुष्टात आलं आहे, अशी सणसणीत टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार पीयुष गोयल यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. दरम्यान, मुंबईच्या कांदीवली येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आयडी जप्त करत त्यांना भाजपच्या सभेसाठी बसण्यास सक्ती करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवासेनेकडून करण्यात आला होता. हा व्हायरल व्हिडीओ अपूर्ण असून आरोप खोटे असल्याचं पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे.
शिवसेना हतबल पक्ष, ज्याचं अस्तित्व संपुष्टात
शिवसेना हा हतबल पक्ष आहे, आरोप खोटे असून व्हिडीओ अपूर्ण आहे. प्रथमच मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ध्रुव यांना वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. त्यांनीच कारवाई केल्याचे बोलून चुकीचं जाहीर केलं. सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे, त्यामुळे त्यांची कथा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
पीयुष गोयल यांची ठाकरे आणि राहुल गांधींवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर वक्तव्य करताना पीयुष गोयल म्हणाले की, राजकारणासाठी काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांबद्दल चुकीची माहिती देतात. मुंबईत झालेल्या इंडिया दलाच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याबाबत पीयुष गोयल म्हणाले की, उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा नष्ट केली आहे.
शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात
पीयुष गोयल यांनी उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवरही निशाणा साधला आहे. यावेळी पीयुष गोयल म्हणाले की, आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससारख्या पक्षांशी युती केली असून, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना हा हतबल पक्ष आहे, ज्याचं अस्तित्व आज संपुष्टात आले आहे. अशा पक्षाच्या विधानांवर विनोद केले जातात, लोक संतप्त होतात, त्यांनी आपल्या कुटुंबासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे.
लवकरच जागावाटपासंदर्भात निर्णय होईल
शिवसेना हा हतबल पक्ष आहे, आरोप खोटे असून व्हिडिओ अपूर्ण आहे. प्रथमच मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ध्रुव यांना वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. त्यांनीच कारवाई केल्याचे बोलून चुकीचे जाहीर केले, असंही गोयल यांनी म्हटलं आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरील प्रश्नाबाबत पीयुष गोयल म्हणाले की, चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे आणि लवकरच त्याची घोषणाही केली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
