मुंबई : आषाढातली 'पंढरपूरची वारी' ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना आणि टाळेबंदीचे संकट वारीवर आहे. मात्र तरीही किमान शंभर वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपूरात घेऊन जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर मंगळवारी म्हणजेच, आज तातडीने सुनावणी पार पडणार आहे.
पंढरपूरच्या वारीची परंपराला ही शेकडो वर्षांपासून सुरू आहे. या सोहळ्यासाठी मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या शेकडो मैलांचा प्रवास करुन पंढरपुराकडे येत असतात. मात्र, यंदा महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून रुग्ण संख्याही दिवेसंदिवस वाढत आहेत. त्यामुळे यंदा सारे सण-उत्सव साधेपणाने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करणं भाग आहे. त्याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदाचं पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली. 29 मे रोजी सरकारने हा निर्णय जाहीर केला. तसं असलं तरी वाखरी ते पंढरपूर या अंतिम 6 किलोमीटरच्या मार्गात 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी काढण्यास परनावगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका वारकरी सेवा संघाने अॅड. मिहिर गोविलकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
हे वाचा : मानाच्या एका पालखी सोहळ्यातील 2 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
पाहा व्हिडीओ : पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत 100 वारकऱ्यांना परवानगी द्या : वारकरी सेवा संघ
वारीतील महत्त्वाच्या परंपरेतील नगर प्रदक्षिणा, स्नान आणि गोपाळकाला सोबतच पौर्णिमेपर्यंत मुक्कामास राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ पुरी रथ यात्रेला दिलेल्या अटी शर्तीप्रमाणे स्वच्छता, आरोग्य, आणि सामाजिक अंतर पाळणे, अशा नियमांचे आम्ही पालन करणार आहोत. असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीने न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मानाच्या एका पालखी सोहळ्यातील 2 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
पंढरपुरात उद्या दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी!