ठाणे : ठाणे शहरातील लॉकडाऊनबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. दुपारी ठाणे पोलिसांनी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार, असं ट्वीट केलं होतं. मात्र महापालिकेकडून अद्यापही त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. आज महापालिकेच्या बैठकीनंतरही याबाबत ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच ठाणे पोलिसांनी दुपारी केलेलं ट्वीट देखील हटवलं आहे. त्यामुळे नक्की लॉकडाऊन लागू होणार की नाही, असा प्रश्न ठाणेकरांन पडला आहे.


"ठाणे शहरात येत्या 2 जुलैपासून पुढील 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे", असं ट्वीट ठाणे शहर पोलिसांनी केलं होतं. प्रशासनाच्या अशा धरसोडपणामुळे शहरात वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित वाढत असल्यामुळे संपूर्ण शहरात लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा आधीच नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर आणि सोशल माध्यमातून फिरत आहेत.


राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यावर चर्चा सुरु आहे. मात्र प्रशासन अद्याप कोणत्याही निर्णयावर पोहोचलेलं नाही. त्यामुळे ठाणेकरांमध्ये आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.


ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम


ठाण्यातील कोरोनाची सद्यस्थिती


ठाणे शहरात आतापर्यंत एकूण 8198 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकूण 3819 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 4072 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 277  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या




#Coronavirus | भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, लांडगे फडणवीसांच्या संपर्कात