एक्स्प्लोर
डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका
डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या दुर्दैवी मृत्यूला जाबाबदार असणाऱ्या प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे.
मुंबई : डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या दुर्दैवी मृत्यूला जाबाबदार असणाऱ्या प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. अमरापूरकरांच्या मृत्यूला करणीभूत असलेल्या पालिका प्रशासनाकडून ५० लाखांची नुकसान भरपाई वसूल करावी तसेच दोषी अधिकऱ्यांवर तातडीनं करवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं ही जनहित याचिका सादर केली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे. २९ ऑगस्टला उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या डॉ. अमरापूरकरांचा मृतदेह ३१ ऑगस्ट रोजी सापडला. यात मुंबई महानगरपालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे.
उघड्या मॅनहोलजवळ धोक्याची सूचना देण्याकरता पालिकेकडून कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. असं या याचिकेत म्हटलं आहे. तसेच अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत याकरता उच्चपदस्थ आणि जाणकारांची समिती स्थापन करावी असे निर्देश राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात यावेत अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement