एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा वादात, खर्चावरुन काँग्रेसची टीका

पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार  नेमण्याची गरज काय असा सवालची काँग्रेसचे विरोधी  पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला.

मुंबई : आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मुंबई महापालिकेच्या राणी बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत पेंग्विनवरचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तीन वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटींचं टेंडर काढण्यात आलं आहे. त्यामुळेचे पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावर काँग्रेसने निशाणा साधलाय. 

यापूर्वीही गेल्या तीन वर्षांसाठी 11 कोटींचं टेंडर काढले होते. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार  नेमण्याची गरज काय असा सवालची काँग्रेसचे मुंबई महापालिकेचे विरोधी  पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला.

यापूर्वीही मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्यावरुन आणि त्यांच्या खर्चावरुन या प्रकल्पाला विरोध झाला होता. एकीकडे कोरोना, लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना पेंग्विनच्या आलिशान लाईफस्टाईलवर एवढा खर्च कशासाठी हा सवाल विरोधकांनी केलाय.
 
राणीबागेतल्या पेंग्विनवर खर्च कसा आहे?

  • पेंग्विनवरचा एका दिवसाचा खर्च 20 हजार रुपये.  
  • एका दिवसाचा सात पेंग्विनवरचा मिळून खर्च दीड लाख रुपये. 
  • एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च सहा लाख रुपये.
  • एका महिन्याचा सात पेंग्विनचा खर्च 42 लाख रुपये. 
  • एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च 71 लाख रुपये. 
  • एका वर्षाचा सात पेंग्विनवरचा खर्च 5 कोटी रुपये.
  • एकूण तीन वर्षांसाठी 7 पेंग्विनचा खर्च 15 कोटी रुपये.

पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण 25 कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर तीन वर्षाच्या देखभालीसाठी 11 कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षित आहे. निविदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकूलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल.

2017 मध्ये दक्षिण कोरियातून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्किय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लिमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिल्लू पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यू झाला आहे.

राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीची पालिकेची सुधारित निविदा काय?

  • पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विनवर खर्च करणार आहे. 
  • 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार. 
  • 2018 मध्ये तीन वर्षाचा देखभालीचा करार हा 11 कोटीचा करण्यात आला होता. तो आता संपत आहे.
  • पेंग्विन कक्षासकट राणीबागेचे उत्पन्न किती?
  • राणीबागेचे वार्षिक सरासरी उत्पन्न 6 ते 6.30 कोटी रुपये 
  • 15 मार्च 2020 पासून राणीबाग कोविड नियमांमुळे बंद केली.
  • 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल राणी बाग पुन्हा खुली झाली.
  • मात्र, दुसऱ्या लॉकडाऊननंतर 5 एप्रिल ते अजूनही राणीबाग बंदच आहे. 

राणी बाग तिकीट किती? 

  • पेंग्विनसह संपूर्ण राणीबागेसाठी वय 3 ते 12 साठी 25 रुपये तिकीट आहे.  
  • 12 वर्षांपुढील तिकीट 50 रुपये. 
  • दोन मोठे व्यक्ती आणि दोन लहान मुले अशा 4 जणांच्या फॅमिली पॅकेजसाठी तिकीट 100 रुपये.
     
    पेंग्विन पाहण्यासाठी वेगळे पैसे आकारले जात नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget