एक्स्प्लोर

दिल्लीत हॉटेल्सची स्वच्छतागृहं वापरता येणार, मुंबईतही नियम लागू व्हावा?

मुंबई : तुम्हाला दक्षिण दिल्लीमध्ये स्वच्छतागृह वापरायचं असेल, तर आता इकडे-तिकडे शोधाण्याची गरज नाही. कारण दक्षिण दिल्ली नगरपालिकेच्या नव्या नियमानुसार तुम्ही कोणत्याही खासगी हॉटेल किंवा रेस्टॉरंटचं स्वच्छतागृह वापरता येणार आहे. ‘पे अँड यूज’नुसार तुम्हाला ही सवलत मिळू शकते. दिल्लीसारखाच नियम मुंबईसारख्या मेट्रोसिटीतही लागू व्हायला हवा, अशी मागणी आता पुढे येताना दिसते आहे. मुंबईत पुरुषांइतक्याच स्त्रियाही कामानिमित्त घराबाहेर पडतात. पण स्वच्छतागृहांची संख्या पाहता महिलांसाठी खूप कमी स्वच्छतागृह आहेत. 2011 मध्ये दाखल केलेल्या आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार पुरुषांसाठी मुंबईत 2 हजार 849 मोफत मुताऱ्या असून, महिलांसाठी मात्र शून्य होत्या. शौचालयांचा विचार करता शौचालय आहेत, पण नि:शुल्क शौचालय एकही नाही. तिथे पुन्हा स्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न वेगळाच आहे. अशा ठिकाणी सहसा काम करणारे पुरुषच असतात. त्यामुळे रात्री-अपरात्री सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. ‘राईट टू पी’ या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मुंबई महानगर पालिकेसोबत सहा वर्ष काम केलं. सुरवातीचे दोन वर्ष त्यांना हक्कासाठीच झगडावं लागलं. मात्र, प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून सातत्याने निराशा पदरी पडत असतानाही ‘राईट टू पी’च्या कार्यकर्त्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. दक्षिण दिल्लीत ज्या प्रकारचा नियम लागू करण्यात आला आहे, तसा नियम जर मुंबईमध्ये लागू झाला, तर हॉटेल व्यावसायिकांचं मत एबीपी माझाने जाणून घेतलं. मात्र, हॉटेल व्यावसायिक या नियमाबाबत नकारात्मक दिसून आले. हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, असा नियम लादणे ही जबरदस्ती असेल. हॉटेल्समध्ये आधीच गर्दी असते. त्यात बाहेरच्या लोकांना प्रवेश कसा देणार आणि प्रश्न पैशाचा नसुन सुरक्षेचा आहे. महिलांमधून या नियमांसाठी मिश्र प्रतिक्रिया आल्या. ‘राईट टू पी’ हा आमचा हक्क आहे. मग यासाठी पैसे का मोजावे? किंवा जर अस्वच्छ ठिकाणी आपण 2 रुपये मोजत असू, तर हॉटेलमध्ये स्वच्छ सुविधेसाठी 5 रुपये मोजणे कठीण नाही इत्यादी प्रतिक्रिया मुंबईतील महिल्यांच्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget