(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parambir Singh : परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ, वसुली प्रकरणात दाऊदचा हस्तक छोटा शकीलची एंन्ट्री
आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि मोक्का लावण्यात आला असल्याची तक्रार शामसुंदर दासने केली असून त्या आधारे परमबीर सिंहावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर सुरु असलेल्या वसुली प्रकरणात आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलची एंन्ट्री झाली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्या श्यामसुंदर अग्रवालच्या म्हणण्यानुसार, त्याला एका खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला. आपल्याला आणि कुटुंबियांना धमकावून वसुली करण्यात आली, असा आरोप श्यामसुंदर अग्रवालनं केला आहे.
या प्रकरणात एबीपीच्या हाती काही फोन रेकॉर्डिंग लागले आहेत. ज्यात एक व्यक्ती बिल्डर संजय पुनमिया याला फोन करून धमकी देत असल्याचं ऐकू येत आहे. श्यामसुंदर अग्रवालबरोबरचा मुद्दा त्यानं मिटवला नाही तर त्याला जीवानिशी मारण्याची धमकी दिलीय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा फोन अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय छोटा शकीलनं केला होता. तर आपल्याला फसवण्यासाठी छोटा शकीलने आपले नाव घेतल्याची तक्रार शामसुंदर दासने केलीय.
काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये?
मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या मते, या ऑडिओ मध्ये छोटा शकील याने संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी दिल्याचं ऐकू येतंय. ज्या नंबरवरुन हा फोन आला होता तो नंबर पोलिसांच्या क्राईम डाटानुसार छोटा शकीलचा आहे. त्यामुळे 2016 सालच्या या ऑडिओ प्रकरणात शामसुंदर अग्रवालवर 17 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा नोंद करुन त्याला मोक्का लावला होता.
शामसुंदर अग्रवाल याच्या तक्रारीवरुन मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. एवढंच नाहीतर परमबीर सिंह 2015 ते 2018 या कालावधीत बदलीनंतर जे घर वापरत होते, त्यासंदर्भातही त्यांना 24 लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi on Tokyo Olympics: स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी आमंत्रित करणार
- Maharashtra HSC Result 2021 : बारावीचा निकाल जाहीर, 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
- Sharad Pawar meets Amit Shah : आज दुपारी शरद पवार घेणार अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण