एक्स्प्लोर

मुंबईतील रस्ते घोटाळ्याचे धागेदोरे पंकजा मुंडेंपर्यंत ?

मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या रस्ते घोटाळ्यात पंकजा यांचं नाव समोर आलं आहे. चिक्की घोटाळ्याचं वादळ शांत होत नाही तोच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंवर आणखी एक आरोप होत आहे. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंचाही सहभाग असल्याचं वृत्त आहे. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं यासंदर्भात बातमी दिली आहे.   रस्ते घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरपीएस कन्स्ट्रक्शन्स या कंपनीसोबत पंकजा मुंडेच्या कंपनीची भागीदारी असल्याची माहिती आहे. जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत आरपीएस कंपनीनं भागीदारी केली. मुंडेंच्या कंपनीशी भागीदारी केल्यानंतर आरपीएस कंपनीला तब्बल 1398 कोटींच्या कामांची कंत्राटं मिळाली.   ऑगस्ट 2015 मध्ये भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या तक्रारीनंतर रस्ते घोटाळ्याचा तपास करण्यात आला होता. रस्ते घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं 6 कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तात्काळ 30 मे 2016 रोजी पंकजा मुंडेंनी सुप्रा कंपनीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.   17 जूनला पोलिसांनी रस्ते घोटाळ्याप्रकरणी 10 जणांना अटक केली आणि पंकजा मुंडेंचे पती चारुदत्त पालवेंनीही भागीदारी संपुष्टात आणली. 'माझे पती अॅडव्हर्टायझिंगमध्ये काम करतात. 2012 मध्ये त्यांनी संबंधित कंपनीशी टायअप केलं. मात्र 4 वर्षात कंपनीशी कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं नाही. म्हणून आम्ही भागीदारी तोडली. 2012 मध्ये तर मी मंत्रिपदावरही नव्हते, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.   राष्ट्रवादीनं मात्र हे संपूर्ण लाचलुचपत विभागाकडे देऊन कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या भ्रष्ट मंत्र्याना क्लीन चिट देता देता मुख्यमंत्र्यांची विधानसभेत दमछाक होत आहे, पण दुसरीकडे भाजप नेत्यांवरील आरोपांची मालिका थांबताना दिसत नाही. रस्ते घोटाळा आम्हीच उघडकीस आणला असं भाजपचे नेते ठासून सांगत आहेत. त्यातच पंकजा मुंडेंचं नाव रस्ते घोटाळ्यात आल्यानंतर मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget