एक्स्प्लोर
Advertisement
पालघरमध्ये थुंकी लावून पैसे रस्त्यावर टाकल्याची अफवा, नागरिकांमध्ये घबराट
पालघरमध्ये सध्या अफवा वेगाने पसरत आहेत. कुडण गावात थुंकी लावून पैसे रस्त्यावर फेकल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
पालघर : पालघर जिल्ह्यातील सध्या अफवांना पेव फुटलेले असताना नागरिक अनेक तर्कवितर्क लढवत असतात. त्यातच काही समाजकंटकांनी थुंकी लावून पैसे रस्त्यावर ठिकठिकाणी टाकल्याची अफवा पसरली आणि पालघरमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पैसे ताब्यात घेतले.
पालघर तालुक्यातील कुडण गावात सोमवारी (20 एप्रिल) हा प्रकार घडला. इथे रात्री दहाच्या सुमारास बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर कुडण ग्रामपंचायतीसमोरच्या भागात 730 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले दिसले. समाजकंटकांनी थुंकी लावून टाकल्याची अफवा पसरल्याने अनेक लोक रस्त्यावर जमा झाले होते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. नागरिकांनी यानंतर पोलिसांना बोलावलं. तारापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणावरुन हे पैसे सुरक्षितरित्या उचलून प्लास्टिक पिशवीत भरले.पालघर जमाव हत्याकांड : 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी
दरम्यान, मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरु असते. यामुळे दुचाकीस्वाराच्या खिशातून पैसे पडल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या अफवांमुळे पालघर जिल्ह्यात अनेक अनुचित प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement