Mega Block on Western Railway: पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक; वसई रोड, वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर ब्लॉक
Mega Block on Western Railway: वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेनं शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेतला आहे.
Mega Block on Western Railway: पश्चिम रेल्वेवर (Western Railway) आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड (Vasai Road Railway Station) आणि वैतरणा (Vaitarna Railway Station) स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेनं शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
तुम्ही पश्चिम रेल्वे मार्गावरुन आज मध्यरात्री प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडा. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेनं शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री 11.50 ते मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक 19101 विरार-भरूच मेमू विरारहून 15 मिनिटं उशिरानं सुटेल. म्हणजे पहाटे 4.35 वाजता नियोजित वेळेऐवजी ती 4.50 वाजता निघेल.
कधी आणि कुठल्या वाहतूकीवर होणार परिणाम?
- वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री 11.50 ते मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक 19101 विरार-भरूच मेमू विरारहून 15 मिनिटे उशिराने सुटेल. पहाटे 4.35 वाजता नियोजित वेळेऐवजी ती 4.50 वाजता निघेल.
- मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा वेळापत्रकावरही परिणाम होणार
पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगालब्लॉक
शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.