(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई पोलिसांकडून 'स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड'चे आयोजन, रविवारी 'हे' रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद
Mumbai Police Marathon: मुंबई पोलिसांकडून 'स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड' आयोजित करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन दौड 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 10 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
Mumbai Police Marathon: मुंबई पोलिसांकडून 'स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड' आयोजित करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन दौड 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 10 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडणारी ही स्पर्धा सकाळी 6 वाजता मुरलीदेवरा चौक मरीन ड्राईव्ह येथून सुरू होईल. या 10 किमीच्या मॅरेथॉन स्पर्धेत 3500 पोलीस सहभागी होणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांकडून 100 वाहनांची रॅली देखील काढण्यात येणार आहे.
पोलीस दलातर्फे आयोजीत या स्पर्धेमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्या जागी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी इतर पर्यायी मार्गाची सोय करण्यात आली आहे. रविवारी कोणत्या मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे, तसेच कोणत्या पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
या मार्गांवर राहणार वाहतूक बंद
- दोराबजी टाटा मार्ग हा एन. सी. पी. ए. गेट नं. 3 ते मुरली देवरा चौक अशा सर्व वाहतूकीस बंद राहणार आहे.
- बॅरिस्टर रजनी पटेल मार्गावरील गेंडा पॉईट ते साखर भवन जं पर्यंत सर्व वाहतूकीसाठी बंद असणार आहे.
- एन. एस. रोड-सदयस्थितीत सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुला आहे. परंतु वर नमुद वेळेत फक्त हलक्या वाहनांना प्रवेश असून जड वाहनाना नमुद वेळी प्रतिबंध राहील. प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज वरून येणारी वाहतूक मेघदुत बिल्डींग ते प्रिन्सेस स्ट्रीट उतरणी एन.एस. रोडपर्यंत बंद राहील.
- मादाम कामा रोड वरील एअर इंडीया ते मंत्रालय जंक्शन (दक्षिण व उत्तर वाहिनी) वाहतुकीस बंद.
- फिप्रेस मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल, जमनालाल बजाज मार्ग एकदिशा मार्ग, विनय के सहा एकदिशा मार्ग, मार्ग ते एन.सी.पी.ए.नेट न. 3 पर्यंत बंद असणार आहे.
वाहन चालकांना पर्यायी मार्ग
- एन. एस. रोड-उत्तर वाहनीवरील वाहने हे मुरली देवरा चौक येथूनच दक्षिण वाहिनीने बॅन्ड स्टॅन्डपर्यत दक्षिण वाहिनीच्या दुभाजकाला लागून पहिल्या लेन मध्ये मार्गक्रमण करतील व पुढे इच्छीत स्थळी जातील.
- बॅरिस्टर रजनी पटेल मार्गावरील गेडा पॉईंट ते साखर भवन जं पर्यंत वाहतूकीसाठी बंद असणारा मार्ग हा स्थानिक रहिवासी यांच्या वाहनाकरीता खुला राहील.
- श्यामलदास जं वरून येणारी वाहने ही प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज नेघदूत बिल्डींगपासून डावे वळण येवून अणुव्रत चौक मार्ग, जी रोड, बी.डी. सोमानी चौक याठिकाणी इच्छीत स्थळी पुढे जातील.
- एन. एस रोड दक्षिण वाहिनीवरून सुंदर महलकडून येणारी वाहने ही मरीन प्लाझा वरून डावे वळण घेऊन के.सी कॉलेजे. जं वरून महर्षी कर्वे मार्गे इच्छीत स्थळी पुढे जातील.
- आंबेडकर जं. मादाम कामा रोड उत्तर वाहिनीवरून येणारी वाहतूक ही गोदरेज जं मार्गे इच्छीत स्थळी पुढे जातील.
- कफ परेडवरून येणारी वाहने ही मंत्रालय जं. उजवे वळण घेऊन दक्षिण वाहणीवरून गोदरजे जं मार्गे इच्छीत स्थळी पुढे जातील.
या अधिसूचनेचा कालावधी जारी केलेल्या दिवसापासून कार्यक्रम सुरू असेपर्यंत राहील, अशी माहितीही वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलीस दलातर्फे १४ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत 'स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड' आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता वाहतुकीची विशेष योजना करण्यात आली आहे.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 13, 2022
त्याबाबतच्या या काही सूचना.#वाहतूक_सूचना #MTPTrafficUpdates pic.twitter.com/h8ZzaV5Hjc