एक्स्प्लोर
निलंबित डीआयजी निशिकांत मोरेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या फैसला
5 जून 2019 रोजी निशिकांत मोरे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या वाढदिवासानिमित्त जमले होते. त्यावेळी केक कापण्याच्या घटनेवरुन मोरेंवर हा विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : डीआयजी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून उद्या म्हणजेच बुधवारी (22 जानेवारी) हायकोर्ट आपला निकाल देणार आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेल्या डीआयजी मोरेंना सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही, त्यामुळे हायकोर्टानेही तूर्तास मोरेंना अटकेपासून कोणताही दिलासा दिलेला नाही.
आजच्या सुनावणीत राज्य सरकारने 'त्या' मोबाईल क्लिपचा पंचनामा कोर्टात सादर केला. निशिकांत मोरेंच्यावतीने दावा करण्यात आला आहे की, त्यांच्याजवळील मोबाईल क्लिपमध्ये पीडित मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग झाल्याचं स्पष्ट होत नाही. गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही दिवस आधी तक्रारदार मुलीने आपल्या पालकांच्या सांगण्यावरुन मोरेंनी आपलं अपहरण केल्याची खोटी तक्रार दिली होती. तसेच हे आरोपही बिनबुडाचे असून केवळ दोन कुटुंबियांमध्ये आर्थिक व्यवहारावरुन निर्माण झालेल्या वादावरुन करण्यात आल्याचे पुरावे कोर्टापुढे मांडले.
तर उशिरा तक्रार दाखल केल्याच्या आरोपाचं तक्रारदाराने खंडन केलं आहे. जूनमध्ये ही घटना घडल्यानंतर जुलैमध्येच याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत लेखी तक्रार दिली होती. मात्र निशिकांत मोरेंचं डिपार्टमेंटमधील वजन पाहता गुन्हा दाखल व्हायला डिसेंबर महिना उजाडला. त्याचबरोबर तक्रारदाराच्यावतीने मोरेंशी संदर्भात आणखी काही प्रकरणांची कोर्टाला माहिती दिली.
निशिकांत मोरेंवर पोक्सो अंतर्गत एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा आरोप ठेवण्यात आला आहे. यासंपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं डीआयजी निशिकांत मोरे यांना सेवेतून निलंबित केलं आहे. याप्रकरणी आरोपी सध्या फरार असून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. तसेच तक्रारदार मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले असून पीडितेचा मोबाईल तसेच मोरेंच्या पत्नीचाही मोबाईल कलिना येथील न्यायवैद्यक शाळेत पाठवला असून त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा असल्याचं सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितलं.
काय आहे प्रकरण?
5 जून 2019 रोजी निशिकांत मोरे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या वाढदिवासानिमित्त जमले होते. त्यावेळी केक कापण्याच्या घटनेवरुन मोरेंवर हा विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 डिसेंबर रोजी पुणे पोलिसांच्या परिवहन शाखेत डीआयजी असलेल्या निशिकांत मोरेंविरोधात नवी मुंबईतील तळोजा पोलीस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलगी सुसाईड नोट लिहून तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने मोरेंच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला जात असल्याचा उल्लेख केला होता. मात्र ही मुलगी आपल्या मित्रासोबत दुसऱ्या राज्यात फिरत असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट होताच त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
केवळ बदनामी करुन बदला घेण्याच्या हेतूनं ही खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा मोरे यांच्यावतीने करण्यात आला आहे. मोरे यांच्या पत्नीसोबत पीडितेच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहार फिसकटल्याने मोरेंविरोधात ही खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. निशिकांत मोरेंच्या पत्नी निशिका मोरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक फसवणुकीची तसेच विनयभंगाची तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पीडितेचे आईवडील सध्या जामीनावर बाहेर आहेत.
संबंधित बातम्या
डीआयजी निशिकांत मोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार करणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता
विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरेंचा जामीन फेटाळला तर पीडितेला धमकावल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हरही निलंबित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement